आज हजर राहण्याची सूचना : मनी लॉंड्रिंग प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला हजर राहण्याचे टाळणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. मनी लॉंड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी त्यांच्या पत्नी आरती देशमुख यांना चौकशीला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.
आज, गुरुवारी सकाळी अकरा वाजता त्यांना बेलार्ड पियार्ड येथील कार्यालयात त्यांना पाचारण केले आहे. मात्र त्या हजर राहतील की नाही, याबद्दल साशंकता आहे. ईडीने मनी लॉंड्रिंग प्रकरणी देशमुख यांना तीन वेळा समन्स बजाविले आहे, तर त्यांचे पुत्र ऋषिकेश यांना एकवेळ समन्स बजाविले आहे. मात्र त्यांनी आतापर्यंत चौकशीला हजर राहण्याचे टाळले आहे. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी प्रत्यक्ष हजर राहण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चौकशीची तयारी दर्शविली आहे. कठोर कारवाई टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता ईडीने त्यांच्या पत्नी आरती यांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे.