ओंकार ग्रुप, अभिनेता जाेशीची मालमत्ता जप्त; ४१० कोटींच्या संपत्तीवर ईडीची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 08:29 AM2022-01-16T08:29:37+5:302022-01-16T08:30:07+5:30
वरळीतील (मुंबई) सेल भवनच्या टॉवर सी मधील सुमारे ३३० कोटी किमतीचे फ्लॅट्स व जोशीच्या वायकिंग कंपनीच्या पुण्यातील विरम परिसरातील ८० कोटींच्या भूखंडाचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबई : शेकडो कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी ओंकार ग्रुप व अभिनेता सचिन जोशी याची ४१० कोटींची मालमत्ता जप्त केली. यात वरळीतील (मुंबई) सेल भवनच्या टॉवर सी मधील सुमारे ३३० कोटी किमतीचे फ्लॅट्स व जोशीच्या वायकिंग कंपनीच्या पुण्यातील विरम परिसरातील ८० कोटींच्या भूखंडाचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कर्ज फसवणूक प्रकरणात ईडीने मनी लॉड्रिंग २००२ कलमांतर्गत दोन वर्षांपूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्यांतर्गत कारवाई केली. गेल्यावर्षी जानेवारीत मे. ओआरडीपीएलचे व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा, चेअरमन कमल किशोर आणि नंतर सचिन जोशीला अटक केली आहे. त्यानंतर त्यांच्या संपत्तीवर टाच आणली जात आहे. ईडीला आढळले की, मेसर्स सुराणा डेव्हलपर्स, वडाळा, एलएलपी, मेसर्स ओआरडीपीएलची संलग्न कंपनी यांनी फसवणूक करून कर्जाची रक्कम ओंकार ग्रुपच्या विक्रीसाठीच्या इमारतीत ४१० कोटींपैकी ३३० कोटींची गुंतवणूक करण्यात आली.