Join us

ईडीची मोठी कारवाई! संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अटक; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 12:12 PM

मुंबईतील कोविड घोटाळा प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे.

मुंबई-मुंबईतील कोविड घोटाळा प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अटक केली आहे. कोविड काळात मुंबई महानगरपालिकेने मोठे कोविड सेंटर उभारण्यात आले होते, यावेळी अनेक लोकांना पात्रता नसताना कामे देण्यात आली होती, नियम डावलून त्यांना कामे देण्यात आली असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. 

मणिपूरची घटना लज्जास्पद, दोषींना सोडणार नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी

गेल्या काही दिवसापूर्वी किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतला होता. जेवढे कॉन्ट्रक्ट या कंपन्यांना देण्यात आली आहेत. या कंपन्या काही दिवसापूर्वी सुरू केल्या आहेत. त्या कंपन्यांना अनुभव नाही, यात अनेक नियम डावलले आहे. ज्या डॉक्टरांच्या नावे बिलं काढण्यात आली ते डॉक्टरही त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते असा आरोपही सोमय्या यांनी केला आहे, या प्रकरणी आता ईडीने कारवाई केला आहे. 

ईडीचे आरोप काय?

जम्बो कोविड हॉस्पीटल सुरू करण्यासाठी काही खासगी कंपन्यांना कंत्राट दिले होते. या कंपनीने जे डॉक्टर आणि संबधीत यंणत्रा दाखवली ती यंत्रणाच अस्तित्वात नव्हती असा आरोप करण्यात आला आहे.  या कारवाईत सुजीत पाटकर हे लाईफ लाईन मॅनेजमेंटचे डिरेक्टर होते तर दुसरे डॉ. किशोर बिचुले बीकेसी जम्बो कोविड सेंटरचे इंचार्ज होते यांना ईडीने अटक केली आहे.  या अटकेने खासदार संजय राऊत यांना आता मोठा धक्का मानला जात आहे. या प्रकरणी आता आणखी काही अधिकारी ईडीच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.  

टॅग्स :संजय राऊतमुंबई