Join us

ईडीकडून रियाविरुद्ध पुराव्याचा शोध सुरूच, माजी मॅनेजर श्रुती मोदीच्या जबाबाचा आधार घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 5:32 AM

सुशांतच्या डेबिट, क्रेडिट कार्ड व इंटरनेट बँकिंगद्वारे केलेल्या व्यवहाराची माहिती मिळविण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आर्थिक व्यवहारातील अनियमिततेबद्दल सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शेकडो तास कसून चौकशी केल्यानंतरही त्यांच्या हाती सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबीयांविरुद्ध ठोस पुरावे हाती लागेलेले नाहीत. दरम्यान, सुशांतची माजी व्यवस्थापक श्रुती मोदी हिने नोंदविलेल्या जबाबाच्या अनुषंगाने ईडीचे रियाविरुद्ध पुरावे मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी सुशांतच्या डेबिट, क्रेडिट कार्ड व इंटरनेट बँकिंगद्वारे केलेल्या व्यवहाराची माहिती मिळविण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.श्रुती गेल्यावर्षी जुलैपासून या वर्षाच्या फेब्रुवारीपर्यंत सुशांतकडे व्यवस्थापक म्हणून काम करत होती. दोन वर्षांपूर्वी सुशांत व रिया एकत्र राहू लागल्यानंतर रिया त्याचे आर्थिक व व्यावसायिक निर्णय घेत होती. दोघांच्या आर्थिक देवाणघेवाण आणि गुंतवणुकीबद्दल आपल्याला काहीही माहिती नव्हते, असा जबाब श्रुतीने ईडीच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे सूत्रांकडून समजते.पोलीस संरक्षण द्या - गणेश हिवरकरसुशांतचा मित्र असल्याचे सांगणारा गणेश हिवरकर या तरुणाला सुशांत व दिशा सालीयन प्रकरणातील अनेक रहस्य माहीत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. तसेच या प्रकरणात सहभाग असलेल्यांची नावेही माहीत असून ती तो फक्त सीबीआयसमोर उघड करण्याचे त्याने माध्यमांसमोर सांगितले आहे. बिहार पोलिसांकडून त्यांने संरक्षणाची मागणी केली आहे. मात्र याप्रकरणी पोलिसांनी आवाहन करूनही त्यांना जबाब देण्यास तो का तयार नाही यावरून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत