मोठी बातमी! अनिल परब यांची १० कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त, ठाकरे गटाला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 04:35 PM2023-01-04T16:35:35+5:302023-01-04T16:36:01+5:30

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) दणका दिला आहे. ईडीकडून अनिल परब यांच्याशी निगडीत १० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

ed has provisionally attached assets worth 10 20 crore in connection with money laundering probe against shiv sena leader anil parab | मोठी बातमी! अनिल परब यांची १० कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त, ठाकरे गटाला धक्का

मोठी बातमी! अनिल परब यांची १० कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त, ठाकरे गटाला धक्का

googlenewsNext

मुंबई-

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) दणका दिला आहे. ईडीकडून अनिल परब यांच्याशी निगडीत १० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. रत्नागिरीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी अनिल परब यांची ईडीकडून चौकशी देखील झाली होती. त्यानंतर आज ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. 

ईडीनं या कारवाई संदर्भात एक ट्विट देखील केलं आहे. यात अनिल परब, साई रिसॉर्ट एनएक्स आणि इतर ठिकाणची १०.२० कोटी रुपयांची मालमत्ता मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. अनिल परब यांनी मात्र या कारवाईविरोधात कोर्टात जाण्याचं भाष्य केलं आहे. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून कारवाई झाली असेल तर याबाबत मी कोर्टात दाद मागणार आहे, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत रत्नागिरीतील ४२ गुंठे जमीन आणि तेथे बांधण्यात आलेल्या साई रिसॉर्टचा समावेश आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या तक्रारीच्या आधारे ईडीने ही कारवाई केली आहे.

Read in English

Web Title: ed has provisionally attached assets worth 10 20 crore in connection with money laundering probe against shiv sena leader anil parab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.