आमदार रवींद्र वायकर यांची तब्बल १० तास ईडी चौकशी, हॉटेलच्या बांधकामात ५०० कोटींचा कथित आर्थिक घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 08:28 AM2024-01-30T08:28:19+5:302024-01-30T08:28:50+5:30

Ravindra Waikar - जोगेश्वरी येथे एका तारांकित हॉटेलच्या बांधकाम व व्यवहारात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दहा तास चौकशी केली.

ED interrogation of MLA Ravindra Waikar for almost 10 hours, alleged financial scam of 500 crores in hotel construction | आमदार रवींद्र वायकर यांची तब्बल १० तास ईडी चौकशी, हॉटेलच्या बांधकामात ५०० कोटींचा कथित आर्थिक घोटाळा

आमदार रवींद्र वायकर यांची तब्बल १० तास ईडी चौकशी, हॉटेलच्या बांधकामात ५०० कोटींचा कथित आर्थिक घोटाळा

मुंबई - जोगेश्वरी येथे एका तारांकित हॉटेलच्या बांधकाम व व्यवहारात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दहा तास चौकशी केली. सकाळी ११ च्या दरम्यान ते ईडीच्या बॅलार्ड पीयर येथील कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. रात्री नऊ वाजता ते ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले. 

जोगेश्वरी पूर्व येथील एका भूखंडावर बांधकाम होत असलेल्या पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामाकरिता वायकर यांनी त्यापूर्वीचे काही करार लपविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे महानगरपालिकेत कार्यरत सबइंजिनिअर संतोष मांडवकर यांनी तक्रार दाखल केली होती. याच आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्याच्या आधारे आता ईडी तपास करत आहे. 

याप्रकरणी ५०० कोटी 
रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप असून अलीकडेच मुंबई महानगरपालिकेने या हॉटेलच्या बांधकामाची परवानगी रद्द केली आहे. याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी ९ जानेवारी रोजी वायकर यांचे निवासस्थान, मातोश्री क्लब, तसेच त्यांच्या व्यावसायिक भागीदारांच्या निवासस्थानी अशी एकूण ७ ठिकाणी छापेमारी केली होती. 

माझी तब्येत बरी नसल्यामुळे यापूर्वी मी ईडीच्या चौकशीला आलो नव्हतो. मी कायद्याच्या कक्षेत राहून काम केले आहे. चौकशीला पूर्ण सहकार्य केले आहे. ज्या क्लबच्या विरोधात तक्रार केली तो १९ वर्षांपासून सुरू होता. तेव्हा तक्रारी नव्हत्या. मान्यता दिल्या त्याप्रमाणे दोन वर्षे काम झाले. पण, राजकीय दबाव आल्यामुळे त्या बांधकामाला स्थगिती दिली. आम्ही त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत.
- रवींद्र वायकर

Web Title: ED interrogation of MLA Ravindra Waikar for almost 10 hours, alleged financial scam of 500 crores in hotel construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.