आमदार रवींद्र वायकर यांची आज ईडी चौकशी; ५०० कोटी रुपयांचे कथित घोटाळा प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 07:01 AM2024-01-23T07:01:07+5:302024-01-23T07:01:56+5:30

ईडीच्या अधिकाऱ्यांनी ९ जानेवारी रोजी वायकर यांचे निवासस्थान, मातोश्री क्लब तसेच त्यांच्या व्यावसायिक भागीदारांच्या निवासस्थानी अशा एकूण ७ ठिकाणी छापेमारी केली होती. 

ED interrogation of MLA Ravindra Waikar today; 500 crore alleged scam case | आमदार रवींद्र वायकर यांची आज ईडी चौकशी; ५०० कोटी रुपयांचे कथित घोटाळा प्रकरण

आमदार रवींद्र वायकर यांची आज ईडी चौकशी; ५०० कोटी रुपयांचे कथित घोटाळा प्रकरण

मुंबई : जोगेश्वरी येथे एका तारांकित हॉटेलच्या बांधकाम व व्यवहारात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवीन्द्र वायकर यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स जारी करत उद्या, मंगळवारी चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी १७ जानेवारी रोजी चौकशीसाठी त्यांना समन्स जारी केले होते. मात्र, त्यावेळी ते चौकशीसाठी उपस्थित राहिले नव्हते. त्यावेळी त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ मागितली होती. परंतु, त्यांना मुदतवाढ न देता हे समन्स जारी करण्यात आले आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी ९ जानेवारी रोजी वायकर यांचे निवासस्थान, मातोश्री क्लब तसेच त्यांच्या व्यावसायिक भागीदारांच्या निवासस्थानी अशा एकूण ७ ठिकाणी छापेमारी केली होती. जोगेश्वरी पूर्व येथील एका भूखंडावर बांधकाम होत असलेल्या पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामाकरिता वायकर यांनी त्यापूर्वीचे काही करार लपविल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे पालिकेत कार्यरत सब-इंजिनिअर संतोष मांडवकर यांनी तक्रार दाखल केली होती. याच आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. या गुन्ह्याच्या आधारे ईडी तपास करत आहे. या प्रकरणी ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप असून, पालिकेने हॉटेल बांधकामाची परवानगी रद्द केली आहे.

Read in English

Web Title: ED interrogation of MLA Ravindra Waikar today; 500 crore alleged scam case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.