Join us

रोहित पवार यांची आज पुन्हा एकदा ईडी चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 10:15 AM

या लिलावासाठी इच्छुक कंपन्यांनी विविध बँकांतून पैसे उचलले होते. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेशी निगडित कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची उद्या, गुरुवारी पुन्हा ईडीचे अधिकारी चौकशी करणार आहेत. यापूर्वी रोहित यांची २४ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी अनुक्रमे १२ आणि साडेआठ तास चौकशी करण्यात आली होती. हे प्रकरण महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेत झालेल्या कथित आर्थिक घोटाळ्याशी संबंधित आहे.

याप्रकरणी ५ जानेवारी रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो कंपनीसह सहा ठिकाणी छापेमारी केली होती. कन्नड सहकारी साखर कारखाना आजारी झाल्यानंतर त्याचा शिखर बँकेतर्फे लिलाव करण्यात आला होता. या लिलावासाठी इच्छुक कंपन्यांनी विविध बँकांतून पैसे उचलले होते. 

टॅग्स :रोहित पवारअंमलबजावणी संचालनालय