Rohit Pawar ( Marathi News ) : मुंबई- राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होणार आहे. दरम्यान, त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर गर्दी केली आहे. रोहित पवार यांच्या चौकशी दरम्यान खासदार शरद पवार राष्ट्रवादी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. तर खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित राहणार आहेत. आज सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.
बंगालमध्ये पहाटे ईडीची कारवाई! टीएमसीचे नेते शाहजहान शेख यांच्या घरावर पुन्हा छापा
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात सुप्रिया सुळेही सहभाग घेणार आहेत. कार्यकर्त्यांनी गर्दी करुन नये असं आवाहनही रोहित पवार यांनी केले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी ईडीने बारामती अँग्रोमध्ये धाड टाकली होती. महाविकास आघाडीतील तीन नेत्यांनी ईडीचे समन्स आले आहे. यात राष्ट्रवादीचे रोहित पवार, शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर, शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांचा समावेश आहे.
नेमकं प्रकरण काय?
कन्नड सहकारी साखर कारखाना आजारी झाल्यानंतर त्याचा शिखर बँकेतर्फे लिलाव करण्यात आला होता. या लिलावासाठी इच्छुक कंपन्यांनी विविध बँकांमधून पैसे उचलले होते. लिलावाच्या प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप होता व त्यावेळी केवळ ५० कोटी रुपयांना बारामती ॲग्रोने या कारखान्याची खरेदी केल्याचा आरोप आहे. तसेच या लिलाव प्रक्रियेत ज्या कंपन्या सहभागी झाल्या होत्या, त्यांच्यातदेखील एकमेकांत झालेले आर्थिक व्यवहार संशयास्पद असल्याचे बोलले जाते. बारामती ॲग्रो, हायटेक इंजिनियरिंग कॉर्पोरेशन इंडिया लि. आणि समृद्धी शुगर प्रा. लि. या कंपन्या या लिलावात सहभागी झाल्या होत्या. यामध्ये हायटेक कंपनीने लिलावासाठी जी प्राथमिक पाच कोटी रुपयांची रक्कम भरली होती, ती रक्कम त्या कंपनीने बारामती ॲग्रोकडून घेतल्याचा आरोप आहे.