Join us  

सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस राजकीय सूड भावनेने, पटोले यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 6:44 AM

भाजपच्या अशा दडपशाहीला काँग्रेस पक्ष भीक घालत नाही, पटोले यांनी साधला निशाणा

मुंबई : भाजपचे केंद्रातील सरकार मनमानी व हुकूमशाही पद्धतीने काम करत असून, विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर करत आहे. नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीने पाठवलेली नोटीस ही राजकीय सूड भावनेने पाठवलेली आहे. भाजपच्या अशा दडपशाहीला काँग्रेस पक्ष भीक घालत नाही, असे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीची नोटीस ही राजकीय द्वेषातून पाठवलेली आहे. या प्रकरणात एका पैशाचाही गैरव्यवहार झालेला नसून, नॅशनल हेरॉल्डशी संबंधित कोणत्याही संचालकाला लाभांश अथवा पैसे मिळालेले नाहीत. हा सर्व व्यवहार पूर्ण पारदर्शक आहे. 

यात कसल्याही प्रकारच्या चल-अचल संपत्तीचे हस्तांतरण झालेले नाही व कोणालाही लाभ झालेला नसताना मनी लाँड्रिंगचा गुन्हा कसा होतो? २०१५ साली बंद झालेले हे प्रकरण पुन्हा उकरून काढण्यामागे केवळ गांधी कुटुंबाला नाहक त्रास देण्याचा प्रकार असल्याचा आरोप पटोले यांनी केला. 

टॅग्स :नाना पटोलेसोनिया गांधीअंमलबजावणी संचालनालय