संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने बजावले समन्स; पीएमसी बँकेचे घोटाळा प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 01:27 AM2020-12-28T01:27:41+5:302020-12-28T07:01:14+5:30

शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक, माजी मंत्री एकनाथ  खडसे यांच्यानंतर आता ईडीने  राऊत यांच्याकडे मोर्चा वळविल्याने त्याचे राजकीय पडसाद उमटू  लागले आहेत

ED issues summons to Sanjay Raut's wife | संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने बजावले समन्स; पीएमसी बँकेचे घोटाळा प्रकरण

संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने बजावले समन्स; पीएमसी बँकेचे घोटाळा प्रकरण

googlenewsNext

मुंबई : शिवसेना नेते खासदार  संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले असून पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना २९  डिसेंबरला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असल्याचे समजते.  

शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक, माजी मंत्री एकनाथ  खडसे यांच्यानंतर आता ईडीने  राऊत यांच्याकडे मोर्चा वळविल्याने त्याचे राजकीय पडसाद उमटू  लागले आहेत. ईडीच्या नोटिसीवर  प्रतिक्रिया देताना संजय राऊत  यांनी, मला याची काहीही कल्पना  नाही. मात्र जर घरी नोटीस  आली असेल, तर मी स्वत:  याबाबत पत्रकार परिषद घेईन आणि माहिती देईन, असे म्हटले असले तरी दुसरीकडे राऊत यांनी, ‘आ देखे जरा किस मे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथिया,’ अशा एका हिंदी चित्रपटातील गाण्याच्या ओळींचे ट्विट करत एक प्रकारे आव्हान स्वीकारल्याचा इशारा दिला आहे.  

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या स्थापनेसाठी वातावरण निर्मिती करण्यामध्ये संजय राऊत यांनी मोठी भूमिका बजाविली होती. त्यानंतर, गेले वर्षभर ते सातत्याने भाजप, पंतप्रधान मोदींवर टीकेची झोड उठवित आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना  ईडीने समन्स बजावल्याने  राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी त्याबाबत टीकेची झोड उडविली आहे.

ईडी, सीबीआय अशा संस्थांनी आपली कार्यालये आता भाजप कार्यालयातच हलवावीत. केवळ भाजपचे विरोधक आहेत, म्हणून जुने प्रकरण उकरून काढून त्यांना त्रास दिला जात आहे. जनतेलाही आता हे समजले आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. 
 

Web Title: ED issues summons to Sanjay Raut's wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.