राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:07 AM2020-12-26T04:07:01+5:302020-12-26T04:07:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालयाकडून ...

ED notice to senior NCP leader Eknath Khadse? | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आल्याच्या वृत्ताने शुक्रवारी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र खडसे यांनी कुठलीही नोटीस मिळाली नसल्याचा खुलासा केला.

ईडीने ३० डिसेंबरला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितल्याची चर्चा आहे. याबाबत ईडीकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. एकनाथ खडसे यांनी भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) सहकारी बँकेतील तब्बल ११०० कोटींचा घोटाळा उघड करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. यामध्ये भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांचा समावेश असल्याची चर्चा शुक्रवारी दिवसभर रंगली होती.

* कुठलीही नाेटीस मिळालेली नाही

खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतेवेळीच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, सध्या तरी आपल्याला कुठलीही नोटीस आली नसल्याचे त्यांनी सांगितले. नोटीस मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देईन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

...............................

Web Title: ED notice to senior NCP leader Eknath Khadse?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.