मुंबई - इक्बाल मिर्ची मालमत्ता प्रकरणाचा तपास आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांच्यापर्यंत पोहोचला आहे. इक्बाल मिर्ची मालमत्ता प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी ईडीने शिल्पा शेट्टीचे पती उद्योगपती राज कुंद्रा यांना नोटीस बजावली आहे. राड कुंद्रा यांना 4 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
अंडर वर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या इकबाल मिर्चीचे फरारी असताना २०१३ मध्ये लंडनमध्ये निधन झाले आहे. त्याने १९८६ मध्ये मोहम्मद युसुफ ट्रस्टच्या वरळी येथील तीन मालमत्ता साडे सहा लाखांना विकत घेतली होती. त्याच्या मृत्यूनंतर ही मालमत्ता सुमारे २०० कोटींना विकण्यात आली आहे. या व्यवहारामध्ये सन्बिक रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने रणजित सिंग बिंद्रा व हारुण युसूफ याने दलाली केली होती.