मुंबई - चेन्नईस्थित गेटवे ऑफिस पार्क्स प्रा. लि. या कंपनीचे सर्वेसर्वा रामप्रसाद रेड्डी यांनी केलेल्या १२९ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ‘ईडी’ने (सक्तवसुली संचालनालय) २९ व ३० नोव्हेंबर रोजी मुंबई व चेन्नईत छापेमारी करत सुमारे ४५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये रोख रक्कम, बँक खात्यातील रक्कम, मुंबईतील आलिशान फ्लॅट आदींचा समावेश आहे. मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
ऑफिसच्या जागा खरेदी-विक्री क्षेत्रात कार्यरत असलेल्या या कंपनीने ग्राहकांकडून गोळा केलेल्या १२९ कोटी रुपयांचे कागदोपत्री व्यवहार केल्याचे दाखवले. मात्र, प्रत्यक्षात कोणतेही व्यवहार झालेले नव्हते. हे पैसे कंपनीचे सर्वेसर्वा रामप्रसाद रेड्डी यांनी व्यक्तिगत खात्यात वळवत या पैशांचा अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.