जेपी इन्फ्रास्ट्रक्चरच्या मुंबईतील कार्यालयावर ईडीचे छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:07 AM2020-12-24T04:07:16+5:302020-12-24T04:07:16+5:30
गोरेगाव, मीरा रोड येथील प्रकल्पावर कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : उत्तर प्रदेशातील एका विरोधी पक्षाच्या नेत्याशी संबंध असलेल्या ...
गोरेगाव, मीरा रोड येथील प्रकल्पावर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उत्तर प्रदेशातील एका विरोधी पक्षाच्या नेत्याशी संबंध असलेल्या जे. पी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या मुंबईत सुरू असलेल्या प्रकल्पाच्या ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी छापे टाकले. त्यांच्या गोरेगाव व मीरा रोड येथील कार्यालयांतील कागदपत्रे जप्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.
सदनिका देण्याच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे वसूल करून त्यांना खोटे पेपर देऊन फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या कार्यालयावर छापे टाकले. दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांची कारवाई सुरू होती.
‘जेपी’ कंपनीने आपले प्रकल्प विविध बँकांकडे गहाण ठेवून अडीच हजार कोटींचे कर्ज उचलले आहे. काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने त्यांच्या कार्यालयावर छापे टाकले हाेते. या कंपनीशी मुंबईतील काही बिल्डरची भागीदारी असून त्यांच्याकडेही लवकरच चौकशी केली जाणार असल्याचे समजते.
......................