Join us

मुंबई आणि केरळमध्ये ईडीची छापेमारी परिचारिका घोटाळा ; २०५ कोटींचा परिचारिका भरती घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 12:32 PM

पी.जे. मॅथ्यू असे या व्यक्तीचे नाव असून मॅथ्यू इंटरनॅशनल नावाची कंपनी तो चालवत होता. 

मुंबई : कुवेतमधील सरकारी रुग्णालयांमध्ये नोकरी लावण्याचे आमिष देत शेकडो महिलांकडून पैसे घेत त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने शुक्रवारी मुंबईकेरळ येथे छापेमारी करत एका भामट्याच्या घरातून ७६ लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. पी.जे. मॅथ्यू असे या व्यक्तीचे नाव असून मॅथ्यू इंटरनॅशनल नावाची कंपनी तो चालवत होता. 

उपलब्ध माहितीनुसार, मॅथ्यू व त्याच्या मुलाने मुनाव्वरा असोशिएटस या कंपनीशी संगनमत करत कुवेतमधील आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयात नोकरी लावण्यासाठी आवश्यक असा परवाना प्राप्त केला. त्यानंतर मुंबई, कोचीन येथे मोठ्या प्रमाणावर कुवेतमधील सरकारी रुग्णालयांत परिचारिकांची नोकरी लावण्याची जाहीरातबाजी केली. शेकडो महिलांनी यासाठी अर्ज केला होता. तिथे नोकरी लावण्यासाठी त्याने प्रत्येक महिलेकडून २० लाख रुपये घेतले होते. मात्र, पैसे घेऊनही या महिलांना नोकरी मिळाली नाही.

त्यानंतर या प्रकरणी सीबीआयकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणामध्ये २०५ कोटी ७१ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे तसेच या पैशांची मोठ्या प्रमाणात फिरवाफिरवी झाल्याचे तपास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर या प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल छापेमारी केला असता त्याच्या विविध बँक खात्यातील ७६ लाख रुपये जप्त केले. तसेच त्याच्या स्थावर मालमत्तेची कागदपत्रेदेखील जप्त केली आहेत. या स्थावर मालमत्तेची किंमत १२ कोटी रुपयेइतकी आहे. हे प्रकरण २०१५ मधील असून या प्रकरणात शेकडो परिचारिकांची फसवणूक झाली होती. 

 

टॅग्स :अंमलबजावणी संचालनालयमुंबईकेरळ