Raj Kundra BREAKING: राज कुंद्राच्या घरी ईडीचे धाडसत्र, कार्यालयातही झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 11:42 IST2024-11-29T11:40:37+5:302024-11-29T11:42:11+5:30

Raj Kundra ED Raid: पोर्नोग्राफी नेटवर्क संदर्भात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा  मुंबईतील राहत्या घरी छापा टाकला आहे.

ED raids shilpa shetty husband Raj Kundra house documents search in office too | Raj Kundra BREAKING: राज कुंद्राच्या घरी ईडीचे धाडसत्र, कार्यालयातही झाडाझडती

Raj Kundra BREAKING: राज कुंद्राच्या घरी ईडीचे धाडसत्र, कार्यालयातही झाडाझडती

मुंबई-

पोर्नोग्राफी नेटवर्क संदर्भात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा  मुंबईतील राहत्या घरी छापा टाकला आहे. यासोबत राज कुंद्रा यांच्या मुंबईतील कार्यालयांवरही ईडीच्या अधिकाऱ्यांकडून धाडसत्र सुरू आहे. 

राज कुंद्राला जून २०२१ मध्ये अश्लील व्हिडिओग्राफी संदर्भातील आरोपांवरुन अटक करण्यात आली होती. पोर्नोग्राफी व्हिडिओ संदर्भात राज कुंद्रा मुख्य आरोपी असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला होता. दोन महिन्यांचे कारागृहात राहिल्यानंतर राज कुंद्रा सप्टेंबर २०२१ पासून जामीनावर आहे. 

पोलिसांच्या दाव्यानुसार, राज कुंद्रा आणि त्यांची कंपनी पोर्नोग्राफी फिल्मच्या माध्यमातून प्रचंड कमाई करत होते. यात सर्व नियमांचा भंग केला जात होता. याप्रकरणी एका तरुणीनं मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात या रॅकेट संदर्भात पहिल्यांदा ४ फेब्रुवारी २०२१ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर याप्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाली होती. 

Web Title: ED raids shilpa shetty husband Raj Kundra house documents search in office too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.