सरनाईक पितापुत्राची वेळ वाढवून देण्याची मागणी ईडीने फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:10 AM2020-12-05T04:10:47+5:302020-12-05T04:10:47+5:30

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी चाैकशीला हजर राहण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाकडे आणखी १४ दिवसांची वेळ मागितली. तर त्यांचा ...

The ED rejected Sarnaik's father's request for an extension | सरनाईक पितापुत्राची वेळ वाढवून देण्याची मागणी ईडीने फेटाळली

सरनाईक पितापुत्राची वेळ वाढवून देण्याची मागणी ईडीने फेटाळली

Next

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी चाैकशीला हजर राहण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाकडे आणखी १४ दिवसांची वेळ मागितली. तर त्यांचा मुलगा विहंगनेही सोमवारपर्यंत वेळ द्यावा, अशी विनंती ईडीकडे केली. मात्र दोघांचीही मागणी फेटाळण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

एमएमआरडीएच्या सुरक्षारक्षक घोटाळ्याप्रकरणी टॉप्स ग्रुप आणि विहंग ग्रुप यांच्यातील आर्थिक व्यवहाराच्या तपासणीसाठी ईडीकडून विहंग सरनाईक यांना ४ ते ५ वेळा समन्स बजावण्यात आले. मात्र ते चौकशीला हजर राहिले नाहीत. त्यांनी शुक्रवारी पत्नी आजारी असल्याने सोमवारपर्यंत वेळ द्यावा, अशी विनंती केली. मात्र ईडीने त्यास नकार दिला.

आमदार प्रताप सरनाईक यांनी ते विलगीकरणात असल्याने पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांचा विलगीकरणाचा कालावधी संपल्याने, त्यांनाही पुन्हा समन्स बजावत गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र ते गैरहजर राहिले. शुक्रवारी त्यांनी ईडीकडे आणखी १४ दिवसांची वेळ मागितल्याचे समजते. त्यांचीही मागणी ईडीने फेटाळल्याची माहिती सूत्रांनी दिली

.................

चांडोळेचा निर्णय लांबणीवर

या घोटाळ्यातील आरोपी व आमदार प्रताप सरनाईक यांचा निकटवर्तीय अमित चांडाेळे याचा ताबा आणखी काही दिवस वाढवून देण्यास विशेष न्यायालयाने नकार दिल्याने ईडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयाने शुक्रवारी राखून ठेवला. चांडाेळेवर पीएमएलए अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

............................

Web Title: The ED rejected Sarnaik's father's request for an extension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.