Breaking : सुजीत पाटकर व भागीदारांची १२ कोटींची संपत्ती जप्त; कोविड घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 12:30 PM2023-12-22T12:30:12+5:302023-12-22T12:40:49+5:30

सुजीत पाटकर यांनी लाइफलाइन मॅनेजमेंट सर्व्हिसेससाठी निविदा मिळवून ३१.८४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

ED seizes Sujit Patkar's assets worth Rs 12 crore in the case of the Kovid center scam | Breaking : सुजीत पाटकर व भागीदारांची १२ कोटींची संपत्ती जप्त; कोविड घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई

Breaking : सुजीत पाटकर व भागीदारांची १२ कोटींची संपत्ती जप्त; कोविड घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई

Sujit Paatkar ( Marathi News ) : कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी सुजीत पाटकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ईडीने कोविड-19 जंबो सेंटर्स घोटाळ्यातील मनी लाँड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांचे जवळचे ४६ वर्षीय सुजीत पाटकर आणि त्यांच्या भागीदारांची सुमारे १२ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुजीत पाटकर हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे कौटुंबिक मित्र मानले जातात. 

 म्युच्युअल फंड युनिटस, बँकेची खाती आणि ३ फ्लॅट्स अशी एकूण १२.२ कोटींची संपत्ती ईडी ताब्यात घेणार आहे. तीन फ्लॅट्सपैकी २.८ कोटींचा एक फ्लॅट हा सुजीत पाटकरांच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे.

पाटकर यांना या प्रकरणी ईडीने या वर्षी जुलैमध्ये अटक केली होती. त्यांनी लाइफलाइन मॅनेजमेंट सर्व्हिसेससाठी निविदा मिळवून ३१.८४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. 

मालमत्ता कोविड घोटाळ्यात कमावल्याचा ईडीचा आरोप

या घोटाळ्यातील सहआरोपींमध्ये राजीव साळुंखे आणि एका महिलेचा समावेश आहे. तसेच डॉ. हेमंत गुप्ता यांचा २ कोटी ७० लाखांचा  म्युच्युअल फंड जप्त करण्यात आला आहे. सहआरोपींच्या खात्यात असलेले ३ कोटी आणि काही बँक खात्यांमध्ये ठेवलेले ३३ लाख रुपयेसुद्धा ईडीने जप्त केले आहेत. ही सर्व मालमत्ता कोविड घोटाळ्यात कमावल्याचा आरोप ईडीने केला आहे. 

कोविड सेंटर्स घोटाळा

हे प्रकरण कोविड-19 साथीच्या काळात मुंबईत महाराष्ट्र सरकारने फील्ड हॉस्पिटल्स संबंधित आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकाला कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा कर्मचारी आणि इतर सुविधा पुरविण्याचे काम सोपवण्यात आले होते.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या संदर्भात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. यात त्यांनी घोटाळ्याचे आरोप केले होते. यात त्यांनी म्हटले होते की, आरोग्य सेवेचा पूर्व अनुभव नसतानाही शिवसेना नेत्यांशी संबंधित कंत्राटदारांना जादा दराने कंत्राटे दिली आहेत.

Web Title: ED seizes Sujit Patkar's assets worth Rs 12 crore in the case of the Kovid center scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.