शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स; सिटी बँक घोटाळा प्रकरणी हजर राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 10:33 AM2021-09-27T10:33:41+5:302021-09-27T10:39:30+5:30

गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्याचे पाहायला मिळत आहे.

ed summons to shiv sena former mp anandrao adsul and his son in ct bank scam case | शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स; सिटी बँक घोटाळा प्रकरणी हजर राहण्याचे आदेश

शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स; सिटी बँक घोटाळा प्रकरणी हजर राहण्याचे आदेश

Next
ठळक मुद्देईडीचे आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना समन्ससिटी बँक घोटाळा प्रकरणी हजर राहण्याचे आदेशभावना गवळी, अनिल परब यांच्यानंतर आनंदराव अडसुळांना ईडीचे समन्स

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना खासदार भावना गवळी (MP Bhavana Gawali) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची ईडीकडून चौकशी सुरू असून, त्यात आता माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांची भर पडली आहे. सिटी सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आमदार रवि राणा यांच्या तक्रारीनंतर ईडीने आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. (ed summons to shiv sena former mp anandrao adsul and his son in ct bank scam case)

अनिल परब यांच्या अडचणीत वाढ! प्रत्यक्ष हजर राहा; ED ने बजावले दुसऱ्यांदा समन्स

सीटी बँकेमध्ये कामगार, पेंशनधारक, ९९ टक्के मराठी लोकांची खाती होती. जवळपास ९ हजार खातेधारक होते. त्या बँकेतील खातेदारांचे पैसे अवैधरित्या बिल्डरांना वाटण्यात आले. त्यात अडसूळांनी २० टक्के कमिशन घेतले. त्यामुळे बँक पूर्ण बुडाली. यामध्ये जवळपास ९८० कोटींचा घोटाळा झाला आहे. दोन वर्षांपूर्वी एफआयआर होऊनही मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्यामुळे ही चौकशी केली नाही, असा आरोप आमदार रवि राणा यांनी केला आहे. ईडीमध्ये दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स बजात चौकशीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले जात आहे. 

“विद्यार्थ्यांकडे १० ते १५ लाखांची मागणी, दलाल घुसल्यामुळेच परीक्षा रद्द”; फडणवीसांचा मोठा आरोप

ईडीचे अधिकारी माझ्या घरी आलेत

सीटी बँकेत ९८० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी फेटाळून लावला आहे. सीटी बँकेत ८०० कोटींची उलाढाल होती. मग, ९८० कोटींचा घोटाळा कसा काय होऊ शकतो? असा सवाल उपस्थित करत, सकाळीच ईडीचे अधिकारी माझ्या घरी आलेत. त्यांनी मला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिल्याची माहिती अडसूळ यांनी दिली. 

“आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे, तेव्हा...”: देवेंद्र फडणवीस

बँकेत गैरव्यवहाराबाबत अगोदर आम्हीच तक्रार केली

खासदार नवनीत राणा यांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणाची तारीख असली की, दरवेळी असे उपद्व्याप सुरू असतात. बँकेत गैरव्यवहाराबाबत अगोदर आम्हीच तक्रार केली आहे. लक्ष विचलित करण्यासाठी ईडी चौकशीचा हा फार्स आहे. राणा दाम्पत्याचे वरपर्यंत संबंध आहेत. आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या खोट्या जातपडताळणी प्रमाणपत्राचा आरोप केला होता. उच्च न्यायालयाने देखील आनंदराव अडसूळ यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच ईडीकडून पहिले समन्स बजाविण्यात आले होते, असा आरोप अभिजीत अडसूळ यांनी केला आहे.

HDFC चा मेगा प्लान! देशातील २ लाख गावांमध्ये करणार सेवाविस्तार; २५०० नोकऱ्या देणार

दरम्यान, मुंबई येथील सिटी बँकेत ९८० कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ईडीने हे समन्स बजावल्याची माहिती आहे. आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत भ्रष्टाचार केला असून, सर्वसामान्य ठेवीदार, गोरगरीब नागरिक, ज्येष्ठ पेंशनधारक यांची आयुष्यभराची जमा रक्कम, गिरणी कामगारांचे पैसे परस्पर लाटल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी ईडीकडे नोंदविलेल्या तक्रारीत केला आहे. ईडीने याआधीही अडसुळांसह माजी आमदार तथा बँकेचे संचालक अभिजीत अडसूळ व जावई यांची घरे, कार्यालयांची झाडाझडती घेतली होती.
 

Web Title: ed summons to shiv sena former mp anandrao adsul and his son in ct bank scam case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.