Anil Parab: अनिल परब यांच्या अडचणीत वाढ! प्रत्यक्ष हजर राहा; ED ने बजावले दुसऱ्यांदा समन्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 10:27 AM2021-09-25T10:27:11+5:302021-09-25T10:29:24+5:30

राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब (Anil Parab) यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहे.

ed summons shiv sena leader and maharashtra minister anil parab in money laundering case | Anil Parab: अनिल परब यांच्या अडचणीत वाढ! प्रत्यक्ष हजर राहा; ED ने बजावले दुसऱ्यांदा समन्स 

Anil Parab: अनिल परब यांच्या अडचणीत वाढ! प्रत्यक्ष हजर राहा; ED ने बजावले दुसऱ्यांदा समन्स 

googlenewsNext
ठळक मुद्देअनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाकडून दुसऱ्यांदा समन्समनी लॉण्ड्रिंगच्या चौकशीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास सांगितलेऑगस्ट महिन्यातील पहिल्या समन्सवेळी उपस्थित राहण्यास दिला होता नकार

मुंबई: राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब (Anil Parab) यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहे. अनिल परब यांना मंगळवारी म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वीही एकदा ईडीने अनिल परब यांना समन्स बजावले होते. मात्र, त्यावेळी अनिल परब यांनी उपस्थित राहण्यास नकार दिला होता. (ed summons shiv sena leader and maharashtra minister anil parab in connection with a money laundering case)

“ओसामाला शहीद म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की जम्मू काश्मीर, लडाख...”; भारताने पाकला सुनावले

अनिब परब यांना ईडीने समन्स बजावण्याची दुसरी वेळ आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये ईडीकडून अनिल परब यांना मनी लॉण्ड्रिंगच्या चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, पूर्वनियोजित कामांचे कारण पुढे करत अनिल परब यांनी ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहण्यास नकार दिला होता. आता ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावल्याने अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. 

TATA ग्रुपचा SuperApp साठी मेगा प्लान; रतन टाटांनी ७ लाख कर्मचारी कामाला लावले!

अनिल परब यांना तब्बल २० कोटी रुपये मिळाल्याचा आरोप

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील मनी लॉण्ड्रिंगच्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. मुंबईतील दहा पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप सचिन वाझेने केला होता. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रकरणात अनिल परब यांना तब्बल २० कोटी रुपये मिळाल्याचा दावा सचिन वाझेने केला होता. यानंतर अनिल परब ईडीच्या रडारवर आले. वाझेच्या जबाबाच्या आधारे ईडीने ३१ ऑगस्ट रोजी अनिल परब यांना समन्स बजावले होते. 

“किरीट सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर मुंबै बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढावा”

“देवेंद्र फडणवीस मोदी सरकारचा निषेध करत ‘तो’ निर्णय थांबवण्यास भाग पाडणार का?” 

दरम्यान, पहिल्यांदा ईडीने समन्स बजावल्यानंतर, नोटीस मिळाली आहे. त्यात कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे नोटीस कशासी संबंधित आहे, हे सांगता येणार नाही. प्रकरण कळत नाही तोपर्यंत काहीही सांगणे कठीण आहे. नोटीसमध्ये फक्त इन्व्हेस्टीगेशनचा पार्ट असल्याचा उल्लेख केला आहे. नोटीसला आम्ही कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ. मला कारणे समजली पाहिजेत. या प्रक्रियेवर कायदेशीर पद्धतीने अभ्यास करुन ईडी चौकशीला सामोरे जाण्याबद्दल निर्णय घेईन. नोटीस कायदेशीर आलेली आहे त्याला कायदेशीर उत्तर दिले जाईल. नोटीस मागचे कारण काय हे जेव्हा समजेल तेव्हा आम्ही उत्तर देऊ, असे अनिल परब यांनी यापूर्वी म्हटले होते. 
 

Read in English

Web Title: ed summons shiv sena leader and maharashtra minister anil parab in money laundering case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.