दापोलीच्या साई रिसॉर्टचा ईडीने घेतला ताबा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 11:42 AM2023-07-20T11:42:13+5:302023-07-20T11:42:44+5:30

याप्रकरणी शिवसेना नेते अनिल परब यांची जून महिन्यात चार वेळा चौकशी झाली होती

ED takes over Sai Resort in Dapoli | दापोलीच्या साई रिसॉर्टचा ईडीने घेतला ताबा

दापोलीच्या साई रिसॉर्टचा ईडीने घेतला ताबा

googlenewsNext

मुंबई : दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्टचा बुधवारी ईडीने औपचारिक ताबा घेतला. याप्रकरणी ४ जानेवारीला ईडीने केलेल्या छापेमारीमध्ये दापोली येथील मुरूडमधील ४२ गुंठे जमीन (किंमत २ कोटी ७३ लाख) आणि साई रिसॉर्ट (किंमत ७ कोटी ४६ लाख) आदी मालमत्तांची तात्पुरती जप्ती केली होती. मात्र, बुधवारी त्याचा औपचारिक ताबा ईडीने घेतला आहे.

साई रिसॉर्टप्रकरणी अनेक मुद्द्यांच्या अनुषंगाने तपास सुरू होता. यामध्ये हे रिसॉर्ट सागरी नियंत्रण क्षेत्र-३ मध्ये येत असल्याच्या मुद्द्यावरून केंद्रीय पर्यावरण विभागाने दापोली येथील न्यायदंडाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.

सरकारी यंत्रणेवर प्रभाव टाकत आणि सरकारी महसुलाचे नुकसान केल्याचा ठपका ठेवत दापोली पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी शिवसेना नेते अनिल परब यांची जून महिन्यात चार वेळा चौकशी झाली होती.

Web Title: ED takes over Sai Resort in Dapoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.