Anil Deshmukh: ED च्या आरोपपत्रात १४ आरोपी, अनिल देशमुखांचे नावच नाही; नेमके कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 11:32 AM2021-09-17T11:32:34+5:302021-09-17T11:34:59+5:30

मनी लॉड्रिंगप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागल्याचे पाहायला मिळाले.

ed told why name of anil deshmukh not included in chargesheet regarding money laundering case | Anil Deshmukh: ED च्या आरोपपत्रात १४ आरोपी, अनिल देशमुखांचे नावच नाही; नेमके कारण काय?

Anil Deshmukh: ED च्या आरोपपत्रात १४ आरोपी, अनिल देशमुखांचे नावच नाही; नेमके कारण काय?

Next
ठळक मुद्देअनिल देशमुख यांना पाचवेळा ईडीकडून समन्सED च्या आरोपपत्रात १४ आरोपीअनिल देशमुखांच्या विरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी

मुंबई: मनी लॉड्रिंगप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागल्याचे पाहायला मिळाले. ईडीने अनिल देशमुखांशी संबंधित मालमत्तांवर छापेही टाकले. ईडीने अनेकदा समन्स बजावूनही अनिल देशमुख यांनी प्रत्यक्ष चौकशीला उपस्थित राहण्यास नकार दिला. उलट समन्स रद्द करण्यासाठी त्यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. आता ईडीने आरोपपत्र दाखल केले असून, यामध्ये सचिन वाझेसह १४ जणांविरोधात आरोप लावण्यात आलेत. विशेष म्हणजे या आरोपपत्रात अनिल देशमुख यांचे नाव नसल्याची माहिती मिळाली आहे. (ed told why name of anil deshmukh not included in chargesheet regarding money laundering case)

आता यापुढे कोरोनापासून कशी घ्यावी काळजी, सर्जिकल मास्क वापरावा की कापडी मास्क?

अनिल देशमुखांशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी ईडीने सादर केलेल्या आरोपपत्रात त्यांचे नाव नसल्याची माहिती समोर येत असून, अनिल देशमुखांची अद्याप चौकशीच झालेली नसल्याचे कारण ईडीकडून देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ईडीच्या आरोपपत्रात सचिन वाझे यांच्यासह अनिल देशमुखांचे सहाय्यक पालांडे आणि कुंदन शिंदे यांचा समावेश आहे. मुंबईतील बार मालकांकडून वसुली प्रकरणात हे आरोपपत्र सादर करण्यात आलं आहे. या प्रकरणी शेकडो कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा तपास यंत्रणेचा संशय आहे. 

सर्वात श्रीमंत तिरुपती देवस्थानच्या ट्रस्टमध्ये मिलिंद नार्वेकर; कसा चालतो कारभार? पाहा

देशमुखांच्या विरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके आणि १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पण हे दोघेही तपास यंत्रणांच्या हाती मात्र लागत नाहीत. चार ते पाच वेळा समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख ईडीसमोर हजर न राहिल्यामुळे त्यांच्या नावाने लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. अशातच आता अनिल देशमुखांचा शोध घेण्यासाठी ईडीने सीबीआयकडे मदत मागितली आहे. 

“मग कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होतेय?”; राणेंचे महापौरांना पत्र

दरम्यान, अनिल देशमुख यांना पाचवेळा तर त्यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना दोन वेळा ईडीकडून समन्स बजावण्यात आले. मात्र सुरुवातीला अनिल देशमुख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जबाब नोंदवला जाण्याची मागणी ईडीकडे केली आणि त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कारण देत पाचही वेळा ते ईडीसमोर आले नाहीत.
 

Web Title: ed told why name of anil deshmukh not included in chargesheet regarding money laundering case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.