मुंबई, दि.3 अमेरिकेच्या मुंबईतील दुतावासात कॉन्सुल जनरलपदी एडगर्ड डी केगन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी एडगर्ड डी केगन कौलालंपूर (मलेशिया) येथील दूतावासात २०१४-१७ या दरम्यान उपप्रमुख या पदावर काम करत होते. त्याआधी सप्टेंबर २०१३ ते जुलै २०१४ दरम्यान ते वॉशिंग्टनमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या यु एस मिशनचे उपसंचालक होते. तेथे त्यांनी यु एस पर्मनंट रेप्रेझेंटिव्ह टू यु एन समान्था पॉवर यांच्या बरोबर विशेष काम केले व नॅशनल सिक्युरिटी कॉउंसिल डेप्युटीस कमिटीमध्ये आपले योगदान दिले. जुलै २०१२ ते ऑगस्ट २०१३मध्ये त्यांनी ब्युरो ऑफ ईस्ट एशियन अँड पॅसिफिक अफैअर्स तर्फे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड व पॅसिफिक आईलॅन्ड्स बरोबरच्या संबंधांवर विशेष लक्ष दिले.
केगन १९९१ मध्ये परदेश सेवेत रुजू झाले व त्यांनी सुरुवातीला डिरेक्टर ऑफ कोरियन अफेअर्स हे पद सांभाळले. एडगर्ड केगन कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) येथे अर्थ व राजकारण विषयक सल्लागार होते, व त्याआधी बीजिंग, तेेेल अविव, बुडापेस्ट व अन्य ठिकाणी त्यांनी काम केले आहे. केगन (१९८९) येल विद्यापीठातील स्नातक पदवीधारक आहेत. त्यांनी (१९८९-९१) न्यू यॉर्क ब्युरो ऑफ ब्रिजेस मध्ये उच्च पदावर काम केले आहे.
त्यांना मँडारिन, स्पॅनिश, फ्रेंच व हंगेरीअन भाषा अवगत आहेत. त्यांचा जन्म शिकागोला झाला असून, त्यांचे बालपण विलमेट (इलिनॉय) येथे गेले आहे. केगन यांच्या मुंबईतील वास्तव्यामध्ये त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी व तीन मुलं आहेत. "पश्चिम भारतात अमेरिकेचे प्रतिनिधित्व करताना मला आणि माझ्या परिवाराला अत्यंत आनंद होत आहे, येथील सर्व लोकांना भेटण्याची संधी मला मिळणार आहे व भारत-अमेरिका संबंधांना नव्या उंचीवर नेताना मला फार आवडेल," अशा शब्दांमध्ये केगन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.