Join us

किनारे असुरक्षित!

By admin | Published: June 06, 2016 2:46 AM

मुंबई शहराची सागर किनारपट्टी दहशतवादी संघटनांसाठी किती सहज उपलब्ध होऊ शकते, याचा अनुभव नुकताच आला. सहापैकी पाच लँडिंग पॉइंट्सवर ‘दहशतवादी’ किती सहजपणे येऊ शकतात

डिप्पी वांकाणी,  मुंबईमुंबई शहराची सागर किनारपट्टी दहशतवादी संघटनांसाठी किती सहज उपलब्ध होऊ शकते, याचा अनुभव नुकताच आला. सहापैकी पाच लँडिंग पॉइंट्सवर ‘दहशतवादी’ किती सहजपणे येऊ शकतात, याचा प्रत्यय ‘सागर कवच’ नावाखाली करण्यात आलेल्या रंगीत तालमीत आला.सागरी किनारपट्टीच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी वर्षातून दोनदा अशा प्रकारची रंगीत तालीम (मॉक ड्रिल) घेण्यात येते. मे महिन्याच्या १७ व १८ तारखेला ही तालीम घेण्यात आली. त्यात भारतीय किनारा रक्षक अधिकाऱ्यांनी रेड फोर्सचे (दहशतवादी) तर किनारा पोलिसांनी पोलिसांचे (ब्लू फोर्स) काम केले होते. किनारा पोलिसांची नजर चुकवून रेड फोर्सच्या जवानांनी पाच ठिकाणी घुसखोरी केली. फक्त एका ठिकाणी रेड फोर्सला अडविण्यात आले. या रंगीत तालमीचा उद्देश दहशतवाद्यांना रोखण्यास किनारारक्षक पोलीस किती सक्षम आहेत, हे तपासण्याचा होता. २६/११ च्या मुंबई हल्ल्यांतील दहशतवादी याच किनारपट्टीवरून शहरात दाखल झाले होते. किनारा लँडिंग पॉइंट म्हणून किती सुरक्षित आहे, याची पाहणी दर सहा महिन्यांनी भारतीय नौदल, भारतीय किनारा रक्षक दल, पोलीस, सागरी पोलीस, कस्टम्स, सीआयएसएफ, गुप्तचर संस्था, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि जेएनपीटी यांच्याकडून केली जाते. या रंगीत तालमीची माहिती आम्ही नुकत्याच संपलेल्या आमच्या अंतर्गत बैठकीत दिली व तपशीलवार बैठक लवकरच मुख्य सचिवांसोबत होईल, असे किनारा विभागाचे पोलीस उपायुक्त किरण चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले.