Join us

कीर्तिकरांना ईडीचं दुसरं समन्स; अमोल कीर्तिकर म्हणाले, 'मी माझ्या मतदारसंघात कुठेही...'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 4:46 PM

"समोर जे पक्ष आहेत त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही महाविकास आघाडी एकत्र राहून लढायला तयार आहे, असंही अमोल कीर्तिकर म्हणाले. 

ठाकरे गटाचे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना ईडीने दुसऱ्यांदा समन्स पाठवले असून त्यांना ८ एप्रिल रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. खिचडी प्रकरणी कथित गौरव्यवहार प्रकरणी कीर्तिकरांना समन्स बजावण्यात आले आहे. या प्रकरणी आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, यावर अमोल कीर्तिकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

"ईडीच्या पहिल्या नोटीसाला उत्तर दिले आहे, न येण्याची कारणे दिली होती. आता ईडीने दुसरे समन्स पाठवले आहे.  मला पक्षाने दिलेली जबाबदारी आहे त्याला मी प्रथमता दिली आहे. त्यादृष्टीने मी त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे, अस स्पष्टीकरण अमोल कीर्तिकर यांनी दिले आहे. 

"समोर जे पक्ष आहेत त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही महाविकास आघाडी एकत्र राहून लढायला तयार आहे, असंही अमोल कीर्तिकर म्हणाले. 

अमोल कीर्तिकर म्हणाले, मी लोकसभा निवडणुकीत व्यस्त आहोत त्यामुळे ईडीला योग्य ते उत्तर देऊ, असंही कीर्तिकर यांनी सांगितले. या एजन्सी त्यांचं काम करत असतात. आता त्यांनी एफआयआरमध्ये त्यांनी नाव दाखवावं. एजन्सींजला मी सहकार्य करत आहे. ईडीने माझी चौकशी केली आहे. यावेळी मला पक्षाने लोकसभेची जबाबदारी दिली आहे, त्यामुळे मी त्यात व्यस्त आहे, मी आता या मतदारसंघातट फिरत आहे, म्हणजे फरार असल्याचा संबंधच येत नाही, असं प्रत्युत्तरही कीर्तिकर यांनी दिले.

टॅग्स :शिवसेनामुंबईअंमलबजावणी संचालनालय