Education: अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी ३ जुलैला, विद्यार्थ्यांना आजपासून नोंदविता येणार पसंतीक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 12:36 PM2023-06-27T12:36:49+5:302023-06-27T12:37:20+5:30
Education: अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील प्रवेशाची मुदत सोमवारी संपली असून पहिल्या फेरीत कॅप प्रवेशांतर्गत प्रवेश मिळालेल्यांपैकी फक्त ४६ टक्के विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत.
मुंबई : अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील प्रवेशाची मुदत सोमवारी संपली असून पहिल्या फेरीत कॅप प्रवेशांतर्गत प्रवेश मिळालेल्यांपैकी फक्त ४६ टक्के विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीत ६३ हजार ५६ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. मंगळवार, २७ जूनपासून विद्यार्थ्यांना दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविता येणार असून दुसरी गुणवत्ता यादी ३ जुलै रोजी जाहीर होणार आहे.
कोट्यांतर्गत १२ हजार प्रवेश
कॅप प्रमाणेच इनहाऊस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यांतर्गतही विद्यार्थ्यांनी प्रवेशाची निश्चिती केली आहे. या तिन्ही कोट्यांतर्गत आतापर्यंत १२ हजार ८४१ विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशाची निश्चिती केली आहे. इनहाऊस कोट्यातून ४ हजार ५७५ विद्यार्थ्यांनी, अल्पसंख्याक कोट्यातून ८००५ तर व्यवस्थापन कोट्यातून २७० विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशाची निश्चिती केली आहे.
अकरावीच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक
२७ जून ते २९ जून
दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविणे
नवीन विद्यार्थ्यांनी नवीन अर्ज नोंदणी करून पहिला भाग प्रमाणात करून पसंतीक्रम नोंदविणे
३ जुलै
दुसरी गुणवत्ता यादी विद्यार्थ्यांच्या लॉगीनमध्ये दर्शविणे
महाविद्यालयाचे कट ऑफ प्रदर्शित होणे
३ ते ५ जुलै
प्रवेश अलॉट झालेल्या महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करणे
प्रवेश निश्चित करावयाचा नसल्यास पुढील फेरीची वाट पाहणे
अकरावी पहिली प्रवेश फेरी
कॅप प्रवेश इनहाऊस अल्पसंख्याक व्यवस्थापन एकूण
प्रवेश क्षमता २३७८९१ २२३६४ १०१४९५ १७१२५ ३७८८७५
प्रवेश निश्चित ६३०५६ ४५७५ ८००५ २७० ७५९०६
रिक्त जागा १७४८३५ १७७८९ ९३४९० १६८५५ ३०२९६९