शैक्षणिक खर्च वाढला, इंग्रजी माध्यमाच्या शाळांची फी परवडेना!; खासगी शाळांची वार्षिक फी हजारो रुपयांच्या घरात 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 02:38 PM2024-10-14T14:38:28+5:302024-10-14T14:38:54+5:30

पालिकेच्या शाळांमध्ये मोफत शिक्षण असले, तरी इंग्रजी शाळांतून शिक्षण घेण्याकडे पालकांचा कल वाढला आहे.

Education costs increased, English medium schools fees are not affordable  | शैक्षणिक खर्च वाढला, इंग्रजी माध्यमाच्या शाळांची फी परवडेना!; खासगी शाळांची वार्षिक फी हजारो रुपयांच्या घरात 

शैक्षणिक खर्च वाढला, इंग्रजी माध्यमाच्या शाळांची फी परवडेना!; खासगी शाळांची वार्षिक फी हजारो रुपयांच्या घरात 

 

मुंबई : आपला पाल्य तीन वर्षांचा झाला की, त्याला शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांचीच घाई अधिक असते. त्यातही तो इंग्रजी माध्यमाच्या शाळेत असेल तर त्याचे शुल्क पाहूनच अनेकांची झोप उडते. सध्या प्री-प्रायमरीपासून सुरू होणारा शैक्षणिक खर्च उच्च शिक्षणापर्यंत परवडेनासा झाला आहे. अगदी पहिलीपासून दहावीपर्यंत विद्यार्थ्यांचा शाळेचा खर्च हा अव्वाच्या सव्वा येतो. 

पालिकेच्या शाळांमध्ये मोफत शिक्षण असले, तरी इंग्रजी शाळांतून शिक्षण घेण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. विनाअनुदानित, अनुदानित मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पालकांना कमी-अधिक प्रमाणात शैक्षणिक खर्च येत असला, तरी इंग्रजी शाळांत प्रत्येक वर्षी वाढणारे शुल्क सर्वसामान्यांना परवडणारे नाही. 

मोफत शिक्षणाकडे पालकांची पाठ 
nग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांत, तर मुंबईत पालिका शाळांमध्ये मोफत शिक्षण दिले जात असले, तरी या शाळांमध्ये मूलभूत सुविधा नसल्याचे कारण देत पालक या शाळांमध्ये पाल्याचा प्रवेश घेत नाहीत.
nएकीकडे भरमसाठ शुल्क देऊन इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेणारे पालक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोफत आणि दर्जेदार शिक्षण असूनही पाठ फिरवत आहेत.

nग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये मूलभूत सुविधा नसल्याचे कारण देत पालक पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेताना दिसतात. 

इंग्रजी शाळांची वार्षिक फी किती? 
इयत्ता पहिली 
४० ते ५० हजार 
इयत्ता दुसरी 
४० ते ५५ हजार 
इयत्ता तिसरी 
५५  ते ६० हजार 
इयत्ता चौथी ते दहावी
७० हजार ते १ लाख 

तज्ज्ञ काय सांगतात?
जगभरात इंग्रजीचा बोलबाला वाढत आहे. शासनाच्या धोरणाचाही हा परिणाम आहे. शासन मराठी शाळांना परवानगी देत नाही.
मात्र, इंग्रजी माध्यमाच्या शाळांना लगेच परवानगी देते. त्यामुळे यात पालकांना दोष न देता त्यांनीच विवेकी बुद्धीने कालसंगत निर्णय घेणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

शहरात प्री-प्रायमरीचे शुल्क किती?
शहर व उपनगरात तर जागोजागी प्री-प्रायमरीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. या शाळांचे शुल्क ५० हजार रुपयांपासून एक लाखापर्यंत असते.
 

Web Title: Education costs increased, English medium schools fees are not affordable 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.