Join us

Education: राज्यातील ६१ हजार शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 12:07 PM

Education: शिक्षण हे गुणवत्तापूर्ण आणि अधिक चांगले व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून योजना राबविल्या जात आहेत. राज्यातील शाळांच्या अनुदानवाढीचा निर्णय घेण्यात आला असून याचा लाभ सुमारे ६१ हजार शिक्षकांना झाला आहे.

मुंबई - शिक्षण हे गुणवत्तापूर्ण आणि अधिक चांगले व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून योजना राबविल्या जात आहेत. राज्यातील शाळांच्या अनुदानवाढीचा निर्णय घेण्यात आला असून याचा लाभ सुमारे ६१ हजार शिक्षकांना झाला आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

सेंट कोलंबा या शाळेत आजी - आजोबा दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी, शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते आजी - आजोबांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या शुभदा केदारी, शाळेच्या माजी विद्यार्थिनी आशा विचारे मामेडी, मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप संगवे उपस्थित होते.

‘शाळेच्या मैदानासाठी निधी उपलब्ध करून देणार’विद्यार्थ्यांच्या आनंदाचा निर्देशांक चांगला असेल, तर ते अधिक चांगले ज्ञानार्जन करू शकतील. सेंट कोलंबा ही शाळा सुमारे १९० वर्षे ही दोन्ही कार्ये उत्तमरित्या करीत असल्याबद्दल शाळेचे कौतुक केसरकर यांनी केले. तसेच शाळेच्या मैदानासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले.  उपसंचालक संगवे यांनी प्रास्ताविकाद्वारे आजी - आजोबा दिवसाचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थिनींनी मल्लखांब, तलवारबाजी, नृत्य आदींचे प्रात्यक्षिक सादर केले.

टॅग्स :शिक्षकशिक्षण क्षेत्रदीपक केसरकर