शिक्षक दिन : शिक्षणामुळे आयुष्य घडले आणि ‘आयपीएस’ झालो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 03:01 AM2019-09-05T03:01:20+5:302019-09-05T03:01:47+5:30

यश मिळवताना शिक्षकांचे प्रेरणादायी मार्गदर्शन मोलाचे ठरले; आई-वडील नेहमीच विश्वासाने पाठीशी राहिले

Education led to life and became 'IPS' | शिक्षक दिन : शिक्षणामुळे आयुष्य घडले आणि ‘आयपीएस’ झालो

शिक्षक दिन : शिक्षणामुळे आयुष्य घडले आणि ‘आयपीएस’ झालो

googlenewsNext

मुंबई : आई-वडिलांसहित शिक्षकांनी माझे आयुष्य घडवले आहे. आज मी ज्या पदावर आहे त्या पदावर जाण्यासाठी शिक्षकांनी प्रेरणा दिली व आई वडील नेहमी विश्वासाने पाठीशी उभे राहिले. माझे वडील सरकारी नोकरीत असल्याने माझ्या शालेय शिक्षणातील मोठा कालावधी कोल्हापूरमध्ये व्यतित झाला. इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण कोल्हापुरात झाले. सातवीनंतरच्या शिक्षणासाठी विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात आगमन झाले. पुण्यातील वास्तव्यामध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. पुण्यातील प्रसिद्ध अशा बृहन्महाराष्ट्र कॉलेज आॅफ कॉमर्स (बीएमएससी)मध्ये कॉमर्समधून पदवी संपादन केली.

महाविद्यालयात पाऊल टाकल्यापासून पदवी मिळेपर्यंत प्रा. दाते मॅडम यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली शिकवण दिली. महाविद्यालयातील प्रा. दाते मॅडम यांच्या प्रोत्साहनाने नागरी सेवा करण्यासाठी आयपीएस अधिकारी बनण्यासाठी यूपीएससी परीक्षा देण्याचा विचार केला व त्याप्रमाणे कार्यवाही केली. सध्याच्या शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या जमान्यात प्रा. दाते मॅडमसारख्या मॅडम मला प्राध्यापिका म्हणून मिळणे हे माझे भाग्य ठरले. विद्यार्थ्यांना विषय चांगला समजावा म्हणून अतिरिक्त वेळ देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकवले. कोचिंग क्लासेसच्या जमान्यात त्यांनी खरा शिक्षक कसा असावा याचे उदाहरण समाजासमोर उभे केले. ज्ञान देण्यासाठी त्यांनी नेहमी विद्यार्थ्यांना सरळ सोप्या भाषेत शिकवले व केवळ पदवी मिळवण्याऐवजी ज्ञान कसे मिळेल यावर भर दिला. जीवनातील उदाहरणे देऊन विषय समजावण्यावर त्यांचा भर होता.

जेव्हा शिक्षक मित्र बनतात...
महाविद्यालयीन जीवनात अकरावी ते चौदावी पुण्यात शिकताना दाते मॅडमच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. पदवी मिळाल्यानंतर पुण्यात सीए कार्यालयात साहाय्यक म्हणून २ वर्षे मी नोकरी केली. यूपीएससी परीक्षा देऊन अधिकारी बनण्याची प्रे्ररणा त्यांनी दिली. विषय समजून घेताना नेहमी त्यांनी प्रॅक्टिकलवर भर दिला. यूपीएससी करण्यासाठी सुरुवातीला पुण्यात तयारी केली व नंतर दिल्लीत मार्गदर्शन घेतले. दिल्लीत मार्गदर्शक म्हणून अनेकांनी मार्गदर्शन केले. माझी आई गृहिणी व वडील राज्य सरकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. सीएच्या कार्यालयात काम करीत असताना आयकर विभागाच्या कार्यालयात कामानिमित्त अनेकदा जावे लागायचे त्या वेळी खुर्चीपलीकडील अधिकारी पदावर जाण्याची इच्छा प्रबळ होत गेली. दाते मॅडमनी अधिकारी बनण्याचे स्वप्न मनात रुजवले होते. त्यांच्या वागणुकीकडे पाहून समाजासाठी काम करण्याची प्रेरणा त्यांच्याकडून घेता आली.

आयुष्यात प्रत्येक बाबीचे मूल्य पैशांमध्ये करता येत नाही याचा धडा त्यांनी स्वत:च्या आचरणातून दिला. विद्यार्थ्यांना माझा मित्रत्वाचा सल्ला देईन की, प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणतातरी चांगला कलागुण युनिक असतो. त्यामुळे प्रत्येकाने दबावाखाली क्षेत्र निवडू नये. आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे ही काळाची गरज आहे. मी सीए कार्यालयात काम करीत असताना त्या वेळी माझ्यासोबत काम केलेल्या जणांना व ज्यांच्या कार्यालयात मी काम केले. त्यांना त्यांच्यासोबतची व्यक्ती आयपीएस अधिकारी झाल्याचा अभिमान वाटतो. हे पाहून आनंद वाटतो. आपल्यासोबत काम करणारे या पदावर जाऊ शकतात असा आत्मविश्वास त्या सहकाऱ्यांमध्ये तयार झाला व त्याचा लाभ अधिकारी बनू इच्छिणाºया विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण होण्यासाठी निश्चितपणे होतो. दाते मॅडमनी दिलेल्या धड्याप्रमाणे आपणही समाजाचे देणे लागतो हा विचार नेहमी माझ्या मनात असतो. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचे स्वरूप व मार्गदर्शन यामध्ये शक्य असेल तेव्हा वेळ काढून मी मार्गदर्शनाला जातो.

इतर विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल...
त्यावर कशा प्रकारे मात करायची याचा सल्ला देण्याचा प्रयत्न करत असतो.
आपण मार्गदर्शन केलेल्यापैकी काही जण यशस्वी झाले तरी मार्गदर्शन केल्याचे सार्थक होईल असे वाटते. सांगली जिल्ह्यातील विटाजवळील चिखलहोळ गावातील एक तरुण सर्वसाधारण आयुष्य जगत असताना चाकोरीतील पदवी संपादन करून नोकरी करीत असताना महाविद्यालयातील प्राध्यापिकेच्या प्रोत्साहनामुळे यूपीएससीकडे वळण्याचा निर्णय घेतो व त्यामध्ये यशस्वी होऊन आयपीएस अधिकारी बनतो, हा प्रवास विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी व उद्बोधक ठरू शकतो. आपण ज्या प्रवासातून गेलो, जे कष्ट करावे त्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळावी व स्पर्धा परीक्षेच्या तयारीत येणारे अडथळे दूर होतील़

शिक्षकाविना आयपीएस
झालो नसतो...

Web Title: Education led to life and became 'IPS'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.