सीईटी प्रवेश परीक्षांसाठी आता एकच कक्ष, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2018 05:18 PM2018-06-08T17:18:29+5:302018-06-08T17:18:29+5:30

मुंबईच्या फोर्ट भागात नुकत्याच स्थलांतरित झालेल्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी कक्ष) आणि प्रवेश नियामक प्राधिकरण कार्यालयाची आज उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पाहणी केली.

 Education Minister Vinod Tawde has now been appointed by the single cell for CET entrance exams | सीईटी प्रवेश परीक्षांसाठी आता एकच कक्ष, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली पाहणी

सीईटी प्रवेश परीक्षांसाठी आता एकच कक्ष, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली पाहणी

Next

मुंबई- वैद्यकीय शिक्षणासह विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या सर्व सामाईक प्रवेश परीक्षा आता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातून नियंत्रित केल्या जाणार आहेत. मुंबईच्या फोर्ट भागात नुकत्याच स्थलांतरित झालेल्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी कक्ष) आणि प्रवेश नियामक प्राधिकरण कार्यालयाची आज उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पाहणी केली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना तावडे यांनी दहावीचा निकाल ८९.४१ टक्के लागला आहे़, असे सांगून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची महिनाभरात फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे, असे सांगून कलमापन चाचणीचा निकाल, पालकांचे समुपदेशन याचा विचार करुन कौशल्य आधारीत परीक्षा विद्यार्थ्यांनी देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, उच्च शिक्षण, आयुष, कला, कृषि, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय या अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षा आता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातून नियंत्रित केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि पालकांसाठी देखील स्वतंत्र मदतकक्ष तयार करण्यात आला असून, यामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी, शाळा सोडल्याचे दाखले आदींची माहिती देण्यात येणार असल्याचे सांगून, तावडे यांनी यंदा दहावी- बारावी परीक्षेचा निकाल वेळेत लागला, त्याबद्दल शिक्षक आणि शिक्षक संघटनांचे आभार मानले.
केंद्र शासनाच्या नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर म्हणजेच ‘नाटा’ मार्फत  घेण्यात येणाऱ्या आर्किटेक्चर परीक्षेत काही अडचणी आहेत, त्यासंदर्भात केंद्रीय मानव संसाधन विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही श्री. विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले.  यावेळी सीईटी आयुक्त आनंद रायते उपस्थित होते.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष तसेच प्रवेश नियामक प्राधिकरण कार्यालयांचे मुख्य कार्यालय दिनांक १ जूनपासून फोर्ट येथील न्यु एक्सलसिअर बिल्डींग येथे  हे नवीन कार्यालय स्थलांतरित झाले आहे.  या कार्यालयात स्वतंत्र प्रशासकीय कक्ष, वैधानिक कक्ष, माहिती तंत्रज्ञान कक्ष, लेखा कक्ष कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

Web Title:  Education Minister Vinod Tawde has now been appointed by the single cell for CET entrance exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.