शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या ट्विटरचं फेक फोटोशॉप, परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना
By पवन देशपांडे | Updated: May 3, 2019 22:45 IST2019-05-03T22:36:07+5:302019-05-03T22:45:15+5:30
विनोद तावडेंचे ट्विटर अकाऊंट हॅक करुन त्यावर एफ वाय बी.कॉमच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याचे म्हटले होते

शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या ट्विटरचं फेक फोटोशॉप, परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना
मुंबई - शिक्षणमंत्री विनोद तावडेंचेट्विटर अकाऊंटचे फोटोशॉप करण्यात आले होते. विशेष म्हणजे या अकाऊंटवरुन परीक्षा रद्द झाल्याची खोटी माहितीही शेअर करण्यात आली होती. मात्र, काही वेळातच त्यांनी आपल्याच ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही तावडे यांनी केले आहे.
विनोद तावडेंचे ट्विटर अकाऊंटचे फोटोशॉप करुन त्यावर एफ वाय बी.कॉमच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याचे म्हटले होते. याबाबत माहिती होताच, तावडेंच्या टेक्निकल टीमने या अकाऊंटवरुन विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षासंदर्भात कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. तसेच सुरू असलेल्या बी. कॉम. एफवायच्या परीक्षाला विद्यार्थ्यांनी हजर राहावे, सर्वांना शुभेच्छा असे तावडेंनी म्हटले आहे.
आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. विनोद तावडे यांच्या ट्वीट (Twit ) ची इमेज फोटोशॉप करून त्याद्वारे उद्या होणारी मुंबई विद्यापीठाची FYB.Com ची परीक्षा रद्द झाल्याचा एक चुकीचा संदेश पाठविला जात आहे. त्यानुसार आपणास कळविण्यात येते की, उद्या होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा दिलेल्या वेळेवर होणार आहेत. कोणतीही परीक्षा रद्द झालेली नाही.
- विनोद माळाळे
उपकुलसचिव- जनसंपर्क
मुंबई विद्यापीठ
The screenshot about the FYBCom university exam is doctored. I urge the students not to believe the rumours that are being circulated and concentrate on the upcoming exams. Best of luck! pic.twitter.com/iNeUVO8UtA
— Chowkidar Vinod Tawde (@TawdeVinod) May 3, 2019
तावडेंनी फोटोशॉप केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉटही आपल्या अकाऊंटवरुन शेअर केला आहे. विद्यापीठाच्या काही तांत्रिक अडचणींमुळे उद्यचा बी. कॉम. एफवायचा पेपर रद्द करण्यात आल्याचे हॅकरने लिहिले होते. तावडेंच्या या हॅक ट्विटला 211 रिट्विट आणि 101 लाईक्सही होते. मात्र, तावडेंनी या ट्विटचा खुलासा करताना हे ट्विट चुकिचे असल्याचे म्हटले आहे. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बेस्ट लक अशा शुभेच्छाही तावडेंनी दिल्या आहेत.