विदयार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेईल -शिक्षणमंत्री विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2017 07:47 PM2017-12-02T19:47:44+5:302017-12-02T19:48:01+5:30

दहावी आणि बारावीची परीक्षा ही विदयार्थ्यांसाठी महत्वाची असते. या परीक्षेचे गांभीर्य लक्षात घेऊन विदयार्थ्यांनी ११ वाजताच्या पेपरसाठी अर्धा तास अगोदर परीक्षावर्गात येणे अपेक्षित आहे.

Education Minister Vinod Tawde will take care that students will not be harmed | विदयार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेईल -शिक्षणमंत्री विनोद तावडे

विदयार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेईल -शिक्षणमंत्री विनोद तावडे

Next

मुंबई - दहावी आणि बारावीची परीक्षा ही विदयार्थ्यांसाठी महत्वाची असते. या परीक्षेचे गांभीर्य लक्षात घेऊन विदयार्थ्यांनी ११ वाजताच्या पेपरसाठी अर्धा तास अगोदर परीक्षावर्गात येणे अपेक्षित आहे. या परीक्षेदरम्यान अर्ध्या तासात विदयार्थ्यांचे हॉलतिकीट तपासणे, प्रश्नपत्रिका देणे असे करणे शक्य होणार असल्याने अर्धा तास अगोदर वर्गात सोडून ११ वाजता परीक्षा सुरु करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.
दहावी आणि बारावीच्या विदयार्थ्यांना ११ नंतर म्हणजेच साधारण ३१ मिनिटांनी उशिरा आल्यावर परीक्षेला बसता येणार नाही. परीक्षागृहात प्रवेश करताना विदयार्थ्यांचा गोंधळ होऊ नये आणि विदयार्थ्यांना तणावमुक्त पध्दतीने परीक्षा देता यावी यासाठी  परीक्षा मंडळाने हा निर्णय घेतला आहे. 
अपवादात्मक परिस्थितीतसुध्दा विदयार्थ्यांच्या शैक्षणिक हितालाच प्राधान्य देण्यात येईल, एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी सरकार घेईल, असेही तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Web Title: Education Minister Vinod Tawde will take care that students will not be harmed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.