आजपासून शिक्षण बचाव आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 03:12 AM2020-05-22T03:12:20+5:302020-05-22T03:12:26+5:30
मुंबई : शिक्षण क्षेत्रातील गोंधळ वाढत असून शालेय शिक्षण विभाग ठोस निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ भाजप शिक्षक आघाडी शुक्रवारपासून ...
Next
मुंबई : शिक्षण क्षेत्रातील गोंधळ वाढत असून शालेय शिक्षण विभाग ठोस निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ भाजप शिक्षक आघाडी शुक्रवारपासून राज्यात शिक्षण बचाव आंदोलन करेल.
लॉकडाउनचे नियम पाळून राज्यभरात शिक्षण उपसंचालक, प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला जाईल, असे भाजप शिक्षक आघाडी मुंबई-कोकण विभागाचे संयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितले.
दहावीच्या भूगोल विषयाच्या गुणांचा तिढा कायम आहे. शिक्षक भरतीवर बंदी आणून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करून शिक्षकांची बेरोजगारी वाढविण्याचे शिक्षण विभागाचे षडयंत्र आहे. या व तत्सम अनागोंदी कारभाराचा निषेध आंदोलनातून होईल, असे ते म्हणाले.