Join us  

जादा दराने दूध विकल्यास शिक्षा

By admin | Published: March 18, 2015 1:56 AM

वाढीव दराने विक्री करणाऱ्यांना २,००० रुपयांचा दंड केला जात असे. पण यापुढे अशा विक्रेत्यांना केवळ दंडावर सुटता येणार नाही, कारण त्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा केली जाईल.

डिप्पी वांकाणी - मुंबईअमूल व आरे या दूध कंपन्यांनी आपले दूध छापील दरापेक्षा जास्त भावाने विकण्याचे तंत्र अवलंबिल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचा निर्णय वजन व मापे नियंत्रण विभागाने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले़ उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबई , नाशिक, पुणे आणि कोकणातील काही गावांत छापील किमतीपेक्षा जादा दराने दूध विकले जाते. आतापर्यंत अशी वाढीव दराने विक्री करणाऱ्यांना २,००० रुपयांचा दंड केला जात असे. पण यापुढे अशा विक्रेत्यांना केवळ दंडावर सुटता येणार नाही, कारण त्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा केली जाईल. पण यासंदर्भात कायद्याअंतर्गत अशी तरतूद आहे, की आरोपीची चौकशीही न करता आमचे अधिकारी त्याच्याकडून दंड वसूल करू शकतात, असे वजन व मापे नियंत्रण विभागाचे महानिरीक्षक संजय पांडे यांनी सांगितले. पण आता विके्रत्याचा पहिलाच गुन्हा असेल तर २५ हजार रुपये, दुसरी वेळ असेल तर ५० हजार आणि तिसऱ्यावेळी न्यायालयासमोर उभे केले जाईल. यात विक्रेत्याला एक वर्षाची शिक्षा होऊ शकते, असे पांडे यांनी सांगितले. यापूर्वी संबंधित लोकांच्या चौकशीबरोबरच महानगर गॅस लि.ची जागा असणाऱ्या मालकाचीही चौकशी केली होती. तसेच आम्ही दुधाबाबतही करणार आहोत. दूध उत्पादक व पुरवठादार यांच्यात काही संबंध असावेत, असा आम्हाला संशय आहे. दुधाची पाकिटे जास्त दराने विकली जात असल्याचे आढळल्यास आम्ही अमूल व आरे आदी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची चौकशी करणार आहोत. आतापर्यंत अशी वाढीव दराने विक्री करणाऱ्यांना २००० रुपयांचा दंड केला जात असे. पण यापुढे अशा विक्रेत्यांना केवळ दंडावर सुटता येणार नाही, कारण त्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा केली जाईल.