Join us

मतदार जागृतीसाठी पथनाटय़ ठरतेय प्रभावी माध्यम

By admin | Published: October 11, 2014 10:51 PM

कुणी भाजी आणायला आलंय तर, कुणी दवाखान्यात उपचारासाठी जातंय, कुणी खरेदीला तर कुणी शाळेत, महाविद्यालयात, नोकरी- धंद्यासाठी..

वरदा प्रभू ल्ल पनवेल
कुणी भाजी आणायला आलंय तर,  कुणी दवाखान्यात उपचारासाठी जातंय, कुणी खरेदीला तर कुणी शाळेत, महाविद्यालयात, नोकरी- धंद्यासाठी.. या सगळ्यांत मिसळून, त्यांच्याशी बोलून साधला जातोय तो संवाद..मतदानाबाबत नागरिकांना जागृत करण्यासाठी सध्या जागोजागी दिसून येतोय तो असाच साधला जाणारा संवाद.. माध्यम आहे ते पथनाटय़ाचे!
सुशिक्षित समजल्या जाणा:या नागरिकांतही मतदानाबाबत दिसून येत आहे ती उदासीनता. ही उदासीनता घालवण्याकरिता सरकारी यंत्रणोनेही रस्त्यावर उतरून मतदार जागृती मोहीम सुरू केली आणि यात महत्त्वाचा वाटा ठरला तो पथनाटय़ांचा. कालर्पयत केवळ मुलगी पाहिजे, गडकिल्ल्यांचे संवर्धन, हुंडा नको एवढेच विषय असलेल्या या पथनाटय़ांनी यावर्षी मात्र जनजागृतीचा महत्त्वाचा वसा घेतल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे गल्लोगल्ली, शहरात यावेळी मतदानाबाबत जागृती झाली ती पथनाटय़ाच्या माध्यमातून. 
तहसील कार्यालय, पोलीस स्थानक अगदी महाविद्यालय, शाळांतूनही मतदानाचा आकडा वाढविण्यासाठी पथनाटय़े घडवून आणली जात आहेत आणि त्याला नागरिकांचा अर्थात मतदार राजाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
आजर्पयत गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी पथनाटय़े करणा:या शिवगडकोट मोहीम संस्थेचे पप्पू जगताप म्हणाले की, आजर्पयत केवळ गडकोट संवर्धनासाठी पथनाटय़े केली मात्र मतदान हाही श्रेष्ठ अधिकार असल्याने मतदान वाढीसाठीही पथनाटय़ांचा केला जात असलेला वापर हा महत्त्वाचाच आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. 
स्री शक्ती संघटनेनेही पथनाटय़ाचे महत्त्वाचे पाऊल उचलले असून आजर्पयत हुंडाबळी, नाकारला जाणारा मुलीचा जन्म यावरच आवाज उठविणाया या गटानेही सामाजिक जाणिवांचा विचार करून मतदानाबाबत स्वत:हून पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. 
 
पथनाटय़ात आली व्यावसायिकता 
च्जागृत झालेल्या मतदारांर्पयत प्रभावीपणो पोहोचण्याकरिता प्रत्येक पक्षाने नवनवी शक्कल लढवली आहे. याकरिता पथनाटय़ातही व्यावसायिकतेने शिरकाव केला आहे. विविध पक्षांनी आपल्या पक्षाचा प्रचार करण्याकरिता पथनाटय़ कलाकारांना कंत्रट दिले असून त्यानुसार त्या- त्या भागात विविध पक्षांचा काही पथनाटय़ ग्रुप्स प्रचार- प्रसारही करत असल्याचे विकी यांनी सांगितले. 
 
प्रभावी बदल
च्चेह:याला रंग फासून किंवा एकसमान कपडे घालून रस्त्यावर उतरून कलाकार एखाद्या गंभीर विषयावर चर्चा करायचे. नागरिकांनाही त्यांचे प्रश्न, चर्चा ही आपली वाटत असे. हा विषय जिव्हाळ्याचा असल्याचे लक्षात येताच नुक्कड नाटकाचे रुपांतर हळूहळू रोड शोमध्ये होऊ लागले. आजकाल एखादी गोष्ट नागरिकांर्पयत पोहोचवायची असेल तर रोडशोच प्रभावी ठरू लागला आहे.