लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आॅगस्ट महिना उजाडूनही अद्याप मुंबई विद्यापीठात उत्तरपत्रिका तपासणी सुरु आहे. त्यामुळे आता निकालाची गती वाढवण्यासाठी प्राध्यापकांना मुंबई विद्यापीठाने पैशाचे आमिष दाखवले आहे. दिवसभरात ५० हून अधिक उत्तरपत्रिका तपासणाºया प्राध्यापकांना अतिरिक्त महागाई भत्ता (डी.ए.) दिला जाणार असल्याची घोषणा विद्यापीठातर्फे करण्यात आली आहे.मुंबई विद्यापीठात सोमवारी मॅनेजमेंट कौन्सिलची बैठक घेण्यात आली. यात उत्तरपत्रिका तपासणीचा वेग वाढावा, निकाल लवकर जाहीर करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. अद्याप विद्यापीठाला २०० हून अधिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करायचे आहेत. पण, वेग कमी असल्याने सर्व बाजूंनी टीका केली जात आहे. त्यामुळे आता विद्यापीठाने ही शक्कल शोधली आहे.ग्रामीण भागात इंटरनेट स्लो असण्याची समस्या अजूनही आहे. विद्यापीठाच्या हातात अवघे आठ दिवस राहिले असतानाही दररोज फक्त १० ते १५ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर होत आहेत. त्यामुळे अखेर निकालाची गती वाढवण्यासाठी प्राध्यापकांना एका दिवसाचा वाढीव महागाई भत्ता देण्यात येईल, असे परिपत्रकच मुंबई विद्यापीठचे परीक्षा व मूल्यमापन विभागाचे प्रभारी संचालक दीपक वसावे यांनी पाठवले आहे.पुनर्मूल्यांकनाच्या शुल्कात ५० टक्क्यांनी घटविद्यापीठाने पुनर्मूल्यांकन आणि छायांकित प्रतीचे शुल्क ५० टक्क्यांनी कमी केले आहे. पूनर्मूल्यांकनासाठी २५० रुपये तर छायांकित प्रतीसाठी ५० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. प्रथम सत्र २०१७ च्या विविध परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. सोमवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे.१९६ निकाल शिल्लकसोमवारी विद्यापीठाने ८ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले. त्यामुळे आतापर्यंत एकूण २८१ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले असून अजून १९६ निकाल शिल्लक आहेत.
प्राध्यापकांना पैशाचे आमिष, उत्तरपत्रिका तपासणीचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 4:34 AM