NTC च्या मिल्स सुरू करण्यासाठी प्रयत्नशील, सुप्रिया सुळेंचं कामगारांना आश्वासन
By महेश गलांडे | Published: December 25, 2020 05:51 PM2020-12-25T17:51:38+5:302020-12-25T17:58:31+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर देश ठप्प झाला होता. याच आदेशानुसार देशात एनटीएसीअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या सर्वच गिरण्याही बंद करण्यात आल्या
मुंबई - देशभरात कोरोना कालावधीत सुरू करण्यात आलेले उद्योग सुरू करण्यात आले आहेत. देशातील आणि राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने केंद्र सरकारने अनलॉक तर राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन म्हणत देशातील जवळपास सर्वच उद्योग सुरू केले आहेत. मात्र, अद्यापही एनटीसीच्या अंतर्गत देशभरात सुरू बंद केलेल्या गिरण्या सुरू करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे, येथील हजारो कामगारांच्या हाताल काम नाही, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईच्या भायखळा येथील राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या इंदू मिल नंबर 5 ला भेट दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर देश ठप्प झाला होता. याच आदेशानुसार देशात एनटीएसीअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या सर्वच गिरण्याही बंद करण्यात आल्या. मात्र, आता हळूहळू सर्वकाही पूर्व पदावर येत असून देशातील उद्योगक्षेत्र सुरू झाले आहेत. पण, अद्यापही राज्यातील 5 आणि देशभरातील एकूण 23 गिरण्या बंद आहेत. त्यामुळे, या मिलमध्ये काम करणाऱ्या कायम आणि कंत्राटी कामगारांचा रोजगार बुडाला आहे. सरकार गिरण्या कधी सुरू करणार? असा प्रश्न गिरणी कामगार विचारत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी भायखळा येथील एनटीसीच्या इंदू मिल नबंर ३ ला भेट देत येथील व्यवस्थापनशी चर्चा केली.
या पार्श्वभूमीवर मिल व्यवस्थापनाशी त्यांच्या मागण्या व इतर प्रश्नांवर चर्चा केली. @ShivSena खासदार श्री. अरविंद सावंत( @AGSawant) जी यांच्याशी मी चर्चा केली असून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून गिरणी कामगारांच्या या प्रश्नावर लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत
— Supriya Sule (@supriya_sule) December 25, 2020
सुप्रिया सुळे यांनी लवकरात लवकर मिल सुरू करुन कामगारांचा प्रश्नी मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असल्याचं म्हटलंय. तसेच, यासंदर्भात खासदार अरविंद सावंत यांच्याशीही आपण चर्चा केल्याचं सुळे यांनी म्हटलंय.