Join us

८ तासांत वृद्धेसह चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Published: August 18, 2016 6:14 AM

आजार आणि नैराश्यातून अवघ्या ८ तासांत ७० वर्षीय वृद्धेसह पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटना मंगळवारी घडल्या. अग्रवाल आणि सायन रुग्णालयात चौघांवरही

मुंबई : आजार आणि नैराश्यातून अवघ्या ८ तासांत ७० वर्षीय वृद्धेसह पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटना मंगळवारी घडल्या. अग्रवाल आणि सायन रुग्णालयात चौघांवरही उपचार सुरू आहेत. मुलुंड आणि भांडुप पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.मुलुंड कॉलनी येथील हनुमान पाडा परिसरात ७० वर्षीय रुक्मिणी दरडे या कुटुंबीयांसोबत राहतात. गेल्या काही वर्षांपासून त्या कंबरदुखीने त्रस्त होत्या. याच त्रासाला कंटाळून मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांना घटनेची माहिती मिळताच, त्यांनी दरडे यांना मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. मुलुंड कॉलनी येथे घडलेल्या या घटनेच्या अर्धा तासाआधी तेथील राहुलनगरमध्ये राहत असलेल्या २० वर्षीय गणेश शहा या तरुणाने विषारी द्रव्य पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता, तर दुपारी १२च्या सुमारास राजू दास या तरुणानेही फिनेल पिऊन स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला. पहाटे चारच्या सुमारास सायबु निजामुद्दिन शेख (२२) या कामगाराने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. तो भांडुप येथील गार्मेंट कंपनीत काम करत होता. आजार आणि मानसिक तणावातून चौघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. आजार, घरगुती वाद, नैराश्य आणि आर्थिक समस्या यामुळे होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. या प्रकरणी मुलुंड आणि भांडुप पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)

-मंगळवारी आत्महत्येच्या प्रयत्नांच्या घटनांनी खळबळ उडाली असताना, सोमवारी रात्रीही एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. -मुलुंड स्वप्ननगरी परिसरात राहत असलेला मुकेश यादव (१९) हा तरुण रात्री दहाच्या सुमारास उद्यानात फेरफटका मारून येतो, असे सांगून बाहेर पडला. -येथील उद्यानात बसून त्याने मित्राला जीव द्यायला जातो, असा मेसेज करून फिनेल प्यायले. मित्राला मेसेज प्राप्त होताच, त्याने कुटुंबीयांना माहिती देत घटनास्थळी धाव घेतली.