कार्यालयातील छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे महिलेने उचलले पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 05:36 AM2018-04-03T05:36:00+5:302018-04-03T05:36:00+5:30

पोलिसात तक्रार करूनदेखील न्याय मिळाला नाही म्हणून कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मुलुंडमध्ये घडली. वृषाली बिर्जे असे या महिलेचे नाव असून मुलुंडच्या खासगी रुग्णालयात ती मृत्यूशी झुंज देत आहे.

The efforts taken by the woman due to the torture of the office | कार्यालयातील छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे महिलेने उचलले पाऊल

कार्यालयातील छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे महिलेने उचलले पाऊल

Next

- मनीषा म्हात्रे
मुंबई - पोलिसात तक्रार करूनदेखील न्याय मिळाला नाही म्हणून कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मुलुंडमध्ये घडली. वृषाली बिर्जे असे या महिलेचे नाव असून मुलुंडच्या खासगी रुग्णालयात ती मृत्यूशी झुंज देत आहे.
मुलुंड पूर्वेकडे वृषाली पतीसोबत राहते. ती विक्रोळीतील डब्ल्यूएनएस या कंपनीत चार वर्षांपासून ज्युनिअर अकाउंटट म्हणून नोकरीला आहे. वर्षभरापासून तिला कंपनीतील सहकाºयाकडून मानसिक त्रास दिला जात होता. याबाबत तिने पार्कसाइट पोलीस ठाण्यात महिनाभरापूर्वी तक्रारही नोंदवली होती. मात्र पोलिसांनी कारवाई केली नाही. वारंवार तक्रार करूनदेखील पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या वृषालीने अखेर रविवारी रात्री उशिरा झोपेच्या २५ गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी तिला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेले.
आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी वृषालीने लिहिलेली सुसाइड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. यात तिने घडलेला सर्व प्रकार लिहून, पोलिसांकडूनदेखील मदत न मिळाल्याची खंत व्यक्त केली. या प्रकरणी महिलेने कंपनीच्या संबंधित कमिटीकडेही तक्रार केली होती. मात्र तेथूनही मदत मिळाली नाही. तिने घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ती तक्रार पुढे पार्कसाइट पोलीस ठाण्यात वर्ग केली होती. याबाबत चौकशी सुरू होती. त्याचवेळी महिलेने हे पाऊल उचलले आहे.
या प्रकरणी अधिक तपास पार्कसाइट पोलीस करत आहेत. दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त अखिलेश सिंग यांनी सांगितले.

असे आहे पत्र
मी वृषाली माझे आयुष्य संपवत आहे. या सगळ्याला कंपनीमधील जयदीप मद्ये, सोनाली व तिचा पती आणि अकलेश जबाबदार आहे. या सगळ्यांना साथ देणारे दिलीप, शेख बाबू आणि त्याचे मित्र व्यवस्थापक कारणीभूत आहेत. या सगळ्यांनी सतत माझे नाव अन्य मुलांसोबत जोडून बदनामी करण्याचा प्रयत्न केला. यामुळे माझ्या कौटुंबिक जीवनात याचे पडसाद उमटले. मॅनेजमेंट आणि पोलिसांनी अद्याप काहीच दखल घेतली नाही. मला हा त्रास सहन होत नाहीय, म्हणून मी जीवन संपवत आहे. ही बदनामी, सततचे वाईट बोलणे सहन होत नाही. मी हरलीय. सॉरी... असे तिने आत्महत्येच्या प्रयत्नापूर्वी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

Web Title: The efforts taken by the woman due to the torture of the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.