Join us  

चोरलेल्या मालासह आठ जणांची टोळी जेरबंद

By admin | Published: June 18, 2014 11:49 PM

याबाबतीत बोईसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोईसर येथील दांडीपाडा येथे राहणाऱ्या रविंद्र राजू (१९) हा एक वर्षापूर्वी सदर कंपनीत काम करत होता.

बोईसर : तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नं.अ‍े. १९ मधील इंडियन ट्रान्सफॉर्मर या कंपनीतील २ लाख ९० हजार रुपये किमतीची चोरलेली कॉपर वायर व दोन लाख रुपयांच्या किंमतीच्या पीकअप व्हॅनसह आठ जणांची टोळी बोईसर पोलिसांनी अवघ्या दोन तासात जेरबंद केली आहे.सुमारे पाचशे किलो वजनाची चोरलेल्या कॉपर वायरचा गुन्हा बोईसर पोलीस स्थानकात दाखल होताच बोईसरचे उपविभागीय पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक एस. के. पोटे यांच्या पथकाने दोन तासाच्या आत मोठ्या शिताफीने गुन्हातील आरोपीचा शोध घेऊन मुद्देमालासह त्यांना पकडले.याबाबतीत बोईसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोईसर येथील दांडीपाडा येथे राहणाऱ्या रविंद्र राजू (१९) हा एक वर्षापूर्वी सदर कंपनीत काम करत होता. त्याने त्याच्या अन्य साथीदारासह प्लॅनिंग करुन चोरी करण्यात यश ही मिळविले आणि मिळविला माल धोडीपूजा येथील एका भंगारवाल्यास विकण्यात आला होता. या गुन्ह्यात रविंद्र राजू सह अक्षय गोरे (२३) मान, सुरज सिद (२२) गणेश नगर बोईसर, कुणाल पाटील (२१) पास्थळ, जयदीप राऊत (२०) पास्थळ व राकेश परदेशी (२८) धोडीपूजा अशा आठ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना पालघरच्या न्यायालयात हजर केले असता २० जूनपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आले आहे. (वार्ताहर)