विनामास्क फिरणाऱ्या आठ लाख लोकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:06 AM2020-12-26T04:06:55+5:302020-12-26T04:06:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - कोरोनापासून बचावासाठी तोंडाला मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, समज, दंडात्मक कारवाई, पोलिसी खाक्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - कोरोनापासून बचावासाठी तोंडाला मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, समज, दंडात्मक कारवाई, पोलिसी खाक्या आणि सार्वजनिक वाहतुकीमध्ये प्रवेश नाकारूनदेखील अनेक ठिकाणी विनामास्क फिरणारे आढळून येत आहेत. आतापर्यंत मुंबई महापालिकेने अशा आठ लाख २० हजार लोकांवर कारवाई केली आहे. दंडाच्या स्वरूपात त्यांच्याकडून १६ कोटी ७६ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क लावणे, हात नियमित स्वच्छ ठेवणे आणि अंतर राखणे महत्त्वाचे आहे. याबाबत महापालिकेने विविध मार्गांनी नागरिकांना आवाहन केले आहे. मात्र, अनेक ठिकाणी नागरिक मास्कचा वापर करीत नसल्याने पालिकेने एप्रिल महिन्यापासून दंडात्मक कारवाईला सुरुवात केली. सुरुवातीला एक हजार रुपये असलेला दंड सप्टेंबरपासून २०० रुपये करण्यात आला. बेस्ट, बस, टॅक्सी अशा सार्वजनिक वाहतुकीमध्ये मास्क नाही - तर प्रवेश नाही, अशी सक्ती करण्यात आली.
मात्र आजही बस, रेल्वे व सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता अथवा चुकीच्या पद्धतीने लावून फिरणारे अधिक असल्याचे दिसून येते. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पालिकेने क्लीनअप मार्शल तैनात ठेवण्यात आले आहेत. तसेच मास्कचे मोफत वाटपही केले. परंतु, जोगेश्वरी पश्चिम, अंधेरी, विलेपार्ले या के पश्चिम विभागात मास्क न लावता फिरणाऱ्या लोकांचा सर्वाधिक समावेश आहे. आतापर्यंत येथे ५४ हजारांहून अधिक लोकांवर कारवाई झाली आहे.
एप्रिल ते २५ डिसेंबर या कालावधीत केलेली कारवाई...
विभाग...परिसर....नागरिक...दंड
के पश्चिम - जोगेश्वरी पश्चिम, अंधेरी, विलेपार्ले - ५४ हजार.. ११ लाख ३५ हजार रुपये.
एल - कुर्ला... ४७,४७२... नऊ लाख ६९ हजार रुपये.
के पूर्व - जोगेश्वरी पूर्व, अंधेरी - ४७,४७२ ..नऊ लाख ६३ हजार रुपये.