आठ महिन्यांत ६.७२ लाख वाघिणींद्वारे ३५.५३ दशलक्ष टन मालवाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:19 AM2020-11-22T09:19:26+5:302020-11-22T09:19:26+5:30

मुंबई : मध्य रेल्वेने २३ मार्च २०२० ते १८ नोव्हेंबर २०२० पर्यंतच्या लॉकडाऊन आणि अनलॉक कालावधीत ६.७२ लाख ...

In eight months, 35.53 million tonnes of cargo was shipped by 6.72 lakh tigers | आठ महिन्यांत ६.७२ लाख वाघिणींद्वारे ३५.५३ दशलक्ष टन मालवाहतूक

आठ महिन्यांत ६.७२ लाख वाघिणींद्वारे ३५.५३ दशलक्ष टन मालवाहतूक

Next

मुंबई : मध्य रेल्वेने २३ मार्च २०२० ते १८ नोव्हेंबर २०२० पर्यंतच्या लॉकडाऊन आणि अनलॉक कालावधीत ६.७२ लाख वाघिणींद्वारे ३५.५३ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आहे.

ऊर्जा व पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी वेळेवर वस्तू व मालपुरवठा खात्रीने पोहोचविण्यासाठी, रेल्वेने लॉकडाऊन व अनलॉक असूनही आपल्या मालगाड्या पूर्णपणे कार्यरत ठेवल्या आहेत. २३ मार्च ते १८ नोव्हेंबर या कालावधीत मध्य रेल्वेने उद्योगक्षेत्राची गरज पूर्ण करीत ३५.५३ दशलक्ष टन मालाची वाहतूक यशस्वीरीत्या केली.

आठ महिन्यात ६,७२,८७९ इतक्या वाघिणींद्वारे मालवाहतूक करण्यात आली. मध्य रेल्वेने कोळसा, अन्नधान्य, साखर, पेट्रोलियम उत्पादने, खते, कंटेनर, लोखंड व स्टील, सिमेंट, कांदे आणि इतर विविध वस्तू वाहून नेणाऱ्या १३,९८१ वस्तूंच्या मालगाड्या चालविल्या. या कालावधी दरम्यान दररोज सरासरी २,७९२ वाघिणींची मालवाहतूक करण्यात आली.

२.६२ वाघिणींद्वारे कोळशाची वाहतूक

मध्य रेल्वेने उपरोक्त कालावधीत वीजपुरवठा अखंडित व सुरळीत राहावा यासाठी कोळशाच्या २,६२,३२७ वाघिणींची वाहतूक विविध ऊर्जा प्रकल्पांसाठी करण्यात आली. तसेच अन्नधान्य आणि साखरेच्या ८,८५८ वाघिणींची वाहतूक केली; शेतकऱ्यांच्या हितासाठी खतांच्या ३१,७४३ वाघिणी आणि कांद्याच्या ७,६१६ वाघिणी; पेट्रोलियम पदार्थांच्या ६३,३०५ वाघिणी; लोह आणि स्टीलच्या १७,३४९ वाघिणी; सिमेंटच्या ४५,०३८ वाघिणी; २,०४,०२१ कंटेनरच्या वाघिणी आणि सुमारे ३२,६२२ वाघिणी डी-ऑईल केक (कडबा) व संकीर्ण वस्तूंच्या वाघिणींची वाहतूक करण्यात आली.

Web Title: In eight months, 35.53 million tonnes of cargo was shipped by 6.72 lakh tigers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.