आठ महिन्यांपासून शिवडीचे क्षयरोग रुग्णालय निवासी डॉक्टरांविना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 12:35 AM2019-03-05T00:35:41+5:302019-03-05T00:35:47+5:30

शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात गेल्या आठ महिन्यांपासून निवासी डॉक्टर नसल्यामुळे शस्त्रक्रियांना विलंब होतो आहे.

For eight months Sewri TB Medical Hospital | आठ महिन्यांपासून शिवडीचे क्षयरोग रुग्णालय निवासी डॉक्टरांविना

आठ महिन्यांपासून शिवडीचे क्षयरोग रुग्णालय निवासी डॉक्टरांविना

Next

मुंबई : शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात गेल्या आठ महिन्यांपासून निवासी डॉक्टर नसल्यामुळे शस्त्रक्रियांना विलंब होतो आहे. या परिस्थितीचा मोठा फटका येथील बाल रुग्णांवर होणाऱ्या शस्त्रक्रियांना बसला आहे, त्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान सहाय्यक म्हणून निवासी डॉक्टरांची क्षयरोग रुग्णालयात वानवा असल्याचे चित्र समोर आले आहे.
क्षयरोगाच्या वाढत्या संसगार्मुळे रुग्णांसोबत डॉक्टरही या रुग्णालयात जाण्यास घाबरतात. अशा परिस्थितीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात डॉक्टरच उपलब्ध होत नसल्याचे समोर आले आहे. बऱ्याच गंभीर अवस्थेत असणाºया क्षय रुग्णांचे फुफ्फुस निकामी झालेले असते.
या परिस्थीतीत क्षयरोग रुग्णांवर करण्यात येणाºया शस्त्रक्रिया या जटील असतात, त्याचप्रमाणे या शस्त्रक्रिया दीर्घकाळ सुरू राहतात. त्यामुळे अशा शस्त्रक्रियांदरम्यान निवासी डॉक्टरांचे सहकार्य लागते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या रुग्णालयात निवासी डॉक्टर येत नाही, किंवा निवासी डॉक्टर आले तरी दोन दिवसांहून अधिक काळ टिकत नसल्याचे वास्तव रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ललितकुमार आनंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडले.

Web Title: For eight months Sewri TB Medical Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.