प.रे.वर आठ नव्या लोकल फेऱ्यांची भर

By admin | Published: October 6, 2016 04:09 AM2016-10-06T04:09:40+5:302016-10-06T04:09:40+5:30

मेल-एक्स्प्रेसचे नवे वेळापत्रक १ आॅक्टोबरपासून लागू केले जातानाच आता पश्चिम रेल्वेने लोकल फेऱ्यांतही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यात आठ फेऱ्यांची भर पडणार असून भार्इंदर

Eight new local ferries are filled up at P.R. | प.रे.वर आठ नव्या लोकल फेऱ्यांची भर

प.रे.वर आठ नव्या लोकल फेऱ्यांची भर

Next

मुंबई : मेल-एक्स्प्रेसचे नवे वेळापत्रक १ आॅक्टोबरपासून लागू केले जातानाच आता पश्चिम रेल्वेने लोकल फेऱ्यांतही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यात आठ फेऱ्यांची भर पडणार असून भार्इंदर, वसई, वांद्रेपर्यंत धावणाऱ्या १० फेऱ्यांचा अनुक्रमे विरार, भार्इंदर, बोरीवलीपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. या नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी १० आॅक्टोबरपासून केली जाईल. चार अप तर चार डाऊन दिशेला लोकल धावतील.

डाऊन दिशेसाठी
चार नवीन फेऱ्या
बोरीवली ते विरार - ६.५0 वा.
चर्चगेट ते विरार - ८.२६ वा.
बोरीवली ते भार्इंदर - १४.२४ वा.
अंधेरी ते विरार - १९.२५ वा.
अप दिशेसाठी
चार नवीन फेऱ्या
विरार ते भार्इंदर - ७.४८ वा.
विरार ते चर्चगेट - ९.५९ वा.
विरार ते अंधेरी - १२.५0 वा.
विरार ते बोरीवली - १३.३८ वा.

रद्द करण्यात
आलेल्या लोकल फेऱ्या
अंधेरी ते चर्चगेट - ७.४५ वा.
वांद्रे ते चर्चगेट - ८.0५ वा.
चर्चगेट ते वांद्रे - ८.४१ वा.
वांद्रे ते चर्चगेट - ९.0३ वा.
बोरीवली ते चर्चगेट - ११.५५ वा.


फेऱ्यांचा विस्तार
फेरी सुटण्याची वेळविस्तार
चर्चगेट ते भार्इंदर११.३२ वा. विरारपर्यंत
चर्चगेट ते बोरीवली१२.१६ वा. विरारपर्यंत
चर्चगेट ते भार्इंदर१३.५५ वा. विरारपर्यंत
चर्चगेट ते वसई१६.0५ वा. विरारपर्यंत
चर्चगेट ते वांद्रे२१.२३ वा. भार्इंदरपर्यंत
चर्चगेट ते वांद्रे२१.२६ वा. बोरीवलीपर्यंत
विरार ते अंधेरी0६.४१ वा. चर्चगेट
विरार ते वांद्रे 0६.४५ वा. चर्चगेटपर्यंत
विरार ते दादर१४.४२ वा. चर्चगेटपर्यंत
वसई रोड ते अंधेरी१७.४0 वा. विरारहून सुटेल

डहाणू रोड फेऱ्यांना चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान सर्व स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. यामध्ये अपवरील ट्रेन क्रमांक ९३00४, ९३0१0, ९३0१८, ९३११२ आणि डाऊनवरील ९३१0३, ९३00५, ९३0११ आणि ९३0१७ चा समावेश आहे.

Web Title: Eight new local ferries are filled up at P.R.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.