Join us

प.रे.वर आठ नव्या लोकल फेऱ्यांची भर

By admin | Published: October 06, 2016 4:09 AM

मेल-एक्स्प्रेसचे नवे वेळापत्रक १ आॅक्टोबरपासून लागू केले जातानाच आता पश्चिम रेल्वेने लोकल फेऱ्यांतही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यात आठ फेऱ्यांची भर पडणार असून भार्इंदर

मुंबई : मेल-एक्स्प्रेसचे नवे वेळापत्रक १ आॅक्टोबरपासून लागू केले जातानाच आता पश्चिम रेल्वेने लोकल फेऱ्यांतही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यात आठ फेऱ्यांची भर पडणार असून भार्इंदर, वसई, वांद्रेपर्यंत धावणाऱ्या १० फेऱ्यांचा अनुक्रमे विरार, भार्इंदर, बोरीवलीपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. या नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी १० आॅक्टोबरपासून केली जाईल. चार अप तर चार डाऊन दिशेला लोकल धावतील. डाऊन दिशेसाठी चार नवीन फेऱ्याबोरीवली ते विरार - ६.५0 वा.चर्चगेट ते विरार - ८.२६ वा.बोरीवली ते भार्इंदर - १४.२४ वा.अंधेरी ते विरार - १९.२५ वा.अप दिशेसाठी चार नवीन फेऱ्याविरार ते भार्इंदर - ७.४८ वा.विरार ते चर्चगेट - ९.५९ वा.विरार ते अंधेरी - १२.५0 वा.विरार ते बोरीवली - १३.३८ वा.रद्द करण्यात आलेल्या लोकल फेऱ्याअंधेरी ते चर्चगेट - ७.४५ वा.वांद्रे ते चर्चगेट - ८.0५ वा.चर्चगेट ते वांद्रे - ८.४१ वा.वांद्रे ते चर्चगेट - ९.0३ वा.बोरीवली ते चर्चगेट - ११.५५ वा.फेऱ्यांचा विस्तारफेरीसुटण्याची वेळविस्तारचर्चगेट ते भार्इंदर११.३२ वा.विरारपर्यंतचर्चगेट ते बोरीवली१२.१६ वा.विरारपर्यंतचर्चगेट ते भार्इंदर१३.५५ वा.विरारपर्यंतचर्चगेट ते वसई१६.0५ वा.विरारपर्यंतचर्चगेट ते वांद्रे२१.२३ वा.भार्इंदरपर्यंतचर्चगेट ते वांद्रे२१.२६ वा.बोरीवलीपर्यंतविरार ते अंधेरी0६.४१ वा.चर्चगेटविरार ते वांद्रे0६.४५ वा.चर्चगेटपर्यंतविरार ते दादर१४.४२ वा.चर्चगेटपर्यंतवसई रोड ते अंधेरी१७.४0 वा.विरारहून सुटेलडहाणू रोड फेऱ्यांना चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान सर्व स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. यामध्ये अपवरील ट्रेन क्रमांक ९३00४, ९३0१0, ९३0१८, ९३११२ आणि डाऊनवरील ९३१0३, ९३00५, ९३0११ आणि ९३0१७ चा समावेश आहे.