मुंबईत तीन वाहनांचा विचित्र अपघात, आठ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 09:08 IST2019-07-24T08:16:24+5:302019-07-24T09:08:41+5:30
पहाटे तीन गाड्यांचा भीषण अपघात झाला आहे.

मुंबईत तीन वाहनांचा विचित्र अपघात, आठ जण जखमी
मुंबईः पहाटे तीन गाड्यांचा अपघात झाला आहे. या अपघातात तीन गाड्या एकमेकांना धडकल्या असून, या अपघातात 8 जण जखमी झाले आहेत. दृष्यमानता कमी असल्यानं हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. मुंबईतल्या पश्चिम महामार्गावरील अंधेरीजवळ हा अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन कारचा चक्काचूर झाला आहे. जवळपास आठवड्याभरानंतर मुंबईत पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. अनेक भागात या पावसानं पाणी साचलं आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, उपचारानंतर त्यांना सोडून दिलं आहे. Mumbai: 8 injured after three cars collided with each other in Andheri, due to low visibility following heavy rainfall in the city, early morning today. #Maharashtrapic.twitter.com/Ts2srOqxd3
(सविस्तर वृत्त लवकरच)