मुंबई : डीएन नगर ते मंडाले या मेट्रो-२ ब मार्गिकेच्या मंडाले येथे कारडेपो उभारण्याकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यापैकी आर्थिक निविदा मंगळवारी प्राधिकरणाद्वारे उघडण्यात आल्या.सॅम बिल्ट वेल प्रायव्हेट लिमिटेड आणि एआय फारास इन्फ्राप्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेड यांचा संयुक्त उपक्रम, जेएमसी प्रोजेक्टस लिमिटेड, रेलकॉन इन्फ्राप्रोजेक्टस लिमिटेड आणि अश्विनी इन्फ्रा डेव्हल्पमेंटस प्रायव्हेट लिमिटेड यांचा संयुक्त उपक्रम, अहलुवालिया कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेड, सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर, एनसीसी, एमबीझेड आणि आरसीसी इन्फ्रा व्हेंचर लिमिटेड यांचा संयुक्त उपक्रम, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर यांचा या आठ पात्र निविदाधारकांमध्ये समावेश आहे.प्राधिकरणाने नेमलेल्या सल्लागारांमार्फत या निविदांचे मूल्यांकन करण्यात येईल. त्यानंतर यशस्वी कंत्राटदारांच्या नेमणुकीला प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात येईल.सर्वसाधारण रस्ते वाहतुकीच्या सर्वच साधनांपेक्षा मेट्रोमुळे जलद अंतर पार करता येईल; तसेच या मार्गिकेमुळे इंधन आणि वेळेच्या बचतीसोबत पर्यावरणाचे जतन होईल, पर्यावरणात सुधारण होईल, असा आशावाद मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) व्यक्त केला आहे.
मेट्रोच्या कारडेपोसाठी आठ निविदा, मेट्रो-२ ब , नामांकित कंपन्या स्पर्धेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 5:41 AM