मुंबईत काेराेनाचे आठ हजार ९३ सक्रिय रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:07 AM2020-12-24T04:07:36+5:302020-12-24T04:07:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत बुधवारी काेराेनाच्या ७४५ रुग्णांचे निदान झाले असून १४ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत बुधवारी काेराेनाच्या ७४५ रुग्णांचे निदान झाले असून १४ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या दोन लाख ८८ हजार ५६१ झाली असून बळींचा आकडा ११ हजार ३३ झाला आहे. सध्या आठ हजार ९३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णदुपटीचा कालावधी ३६१ दिवसांवर पोहोचला आहे.
मुंबईत आतापर्यंत कोरोनाच्या २२ लाख ५० हजार ३२८ चाचण्या झाल्या आहेत. तर, १६ ते २२ नोव्हेंबरपर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर ०.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. शहर, उपनगरांतील चाळी व झोपडपट्ट्यांच्या वस्तीत सक्रिय कंटेनमेंट झोन्सची संख्या २६० झाली आहे. मुंबईत सक्रिय सीलबंद इमारती दाेन हजार ७६६ आहेत. मागील २४ तासांत पालिकेने अतिजोखमीच्या दाेन हजार ४१ सहवासितांचा शोध घेतला आहे.
..........................