मुंबई : आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील कमी विद्यार्थी संख्येच्या आठ शासकीय आश्रमशाळा पुढील शैक्षणिक वर्षापासून बंद करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने बुधवारी घेतला. त्यात कुरुंजी आणि पांगरी, जि.पुणे, बामणोली आणि गोगवे; जि.सातारा, कोते आणि बोरवेट; जि.कोल्हापूर, कादवण आणि वेरळ; जि.रत्नागिरी येथील आश्रमशाळांचा समावेश आहे.या शाळांच्या परिसरात आदिवासी जमातीची लोकवस्ती फारच कमी आहे. तेथे निवासी आदिवासी विद्यार्थी उपलब्ध होत नाहीत. उर्वरित सर्व विद्यार्थी बिगर आदिवासी आहेत. या आश्रमशाळा सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतरित करण्याचे शासनाचेच आदेश होते. मात्र, त्या हस्तांतरित होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आता शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या शाळा बंद करण्यात आल्यानंतर तेथील कायम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना इतर आश्रमशाळांमध्ये समायोजित करण्यात येणार आहे.
आठ आदिवासी आश्रमशाळा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 4:37 AM